(Milind ekbote works with Muslim hatred in mind) मिलिंद एकबोटे संदर्भात सामाजिक कार्यकर्ते अंजुम इनामदार यांचे काय मत आहे पाहूया .
गेल्या तीस वर्षाचा जर या माणसाचा (मिलिंद एकबोटेचा) इतिहास पाहिला तर असे आढळून येते की
सदर व्यक्ती कोणत्या ना कोणत्या कारणाने पुणे जिल्ह्यात व महाराष्ट्रात हिंदू व मुस्लिमांचे दंगल कशी घडवावी यासाठी ते प्रयत्नशील असतात,
सातारा वाई येथे झालेल्या दंगलीत सुद्धा त्यांचा मोठा हात होता. छत्रपती शिवाजी महाराजांचा खोटा इतिहास सांगून मुस्लिमांना टार्गेट करतात
व हिंदूंचे डोके फिरून मुस्लिमविरोधी करण्याचं काम त्यांनी अनेक वर्ष केलेले आहे.
वाचा: दोन समाजात तेढनिर्माण होईल असे वक्तव्य केल्या प्रकरणी मिलिंद एकबोटेवर गुन्हा दाखल.
भाकड जनावर घेऊन जाणारे मुस्लिम कुरेशी बांधवांकडून किंवा विकायला आलेल्या हिंदू शेतकरीबंधून कडून ती भाकड जनावर बळजबरीने चोरून पांजरपोळ येते ठेवण्याचे काम
व नंतर पांजरपोळ येथून त्या भाकड जनावर लंपास करून पुन्हा शेतकरी किंवा कुरेशी बांधवांना विकण्याचे काम त्यांनी केल्या बाबतची ही तक्रार पुणे पोलीस ठाणे मध्ये आहे.
ज्या कोंढव्याबाबत ते नेहमी बोलतात मिनी पाकिस्तान मिनी पाकिस्तान आतंकवादयांचा अड्डा आतंकवादयांचा स्लीपर सेल.
एकबोटे यांना पूर्ण कल्पना आहे की गेल्या पंधरा वर्ष शिवसेना पक्षाचे नगरसेवक महादेव रामचंद्र बाबर मुस्लिम भागातून पंधरा वर्षे निवडून आले व उपमहापौर ही झाले.
2005 ते 2010 पर्यंत शिवसेना पक्षाचे आमदार महादेव बाबर होते.
2005 पूर्वी कोंढवा भागातील मुस्लिम बांधवांनी महादेव बाबर यांच्या बोलण्यावरून सूर्यकांत लोणकर यांना शिवसेनेचे आमदार बनविले.
नंतर महादेव बाबर यांच्या बोलण्यावरून भाजपाचे आमदार योगेश टिळेकर यांना कोंढवा या भागातील मुस्लिमांनी निवडून दिले.
व नुकत्याच झालेल्या निवडणुकीत चेतन तुपे पाटलांनाही त्या भागातील मुस्लिमांनी बाबर यांच्या बोलण्यावरून निवडून दिले.
त्या भागातील हिंदू आणि मुस्लिमांचे ऐक्य जाती सलोखा नेहमी त्यांच्या डोळ्यात सळसळते.
कोंढवा वसविण्यामध्ये महादेव बाबर यांचा खूप मोठा योगदान आहे. कदाचित महादेव बाबर यांच्या हाती चूक झाली असेल.
पुण्यात सर्वात जास्त हुशार असणारा नेहमी दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणारा समाजा समाजात भांडणे लावणारा मिलिंद एकबोटे याला जास्त समजत असेल.
म्हणूनच कोंढवा या भागाची बदनामी सतत करीत आहे.
भीमा कोरेगाव येथे झालेल्या दंगलीचा मुख्य सूत्रधार मिलिंद एकबोटे यांचा कायमचा बंदोबस्त पुणे पोलिसांनी केला पाहिजे.
असे आव्हान मूलनिवासी मुस्लिम मंचाचे अध्यक्ष अंजुम इनामदार यांनी केले आहे.