CAB & NRC विरोधात मुस्लीम समाजातर्फे 29 डिसेंबर रोजी महामोर्चा
CAB & NRC : सजग नागरिक टाइम्स : पुणे शहरातून मुस्लीम समाजातर्फे 29 डिसेंबर रोजी भव्य भव्य महामोर्चा चे आयोजन करण्यात आले आहे.
मोदी सरकारने भारतात लागू केलेले नागरिकता संशोधन बिल (CAB ) व पब्लिक सिटिझनशिप ( NRC ) मुळे संपूर्ण देशाला व देशवासियांना मोठे नुकसान होणार आहे व होत हि आहे.
तसेच या कायद्यामुळे देशात जातिभेद वाढण्याची शक्यता असल्याने व संविधान धोक्यात आल्याने देशभरात विविध ठिकाणी निदर्शने चालू आहे.
सदरील कायदा रद्द व्हावा यासाठी पुण्यातील विविध संघटना एकत्रित येऊन कायद्याच्या चौकटीत ही महारॅली काढणार असल्याचे ठरले आहे.
सदरील मोर्चा हा 29 डिसेंबर रोजी गोळीबार मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जाणार आहे,
या मोर्च्याची वेळ सकाळी दहा ते मोर्चा संपेपर्यंत असणार आहे, हा मोर्चा माजी आयपीएस अधिकारी अब्दुर रहमान यांच्या मार्गदर्शनाखाली निघणार आहे.
या मोर्चा संदर्भात काल मालधक्का चौकातील बाबासाहेब आंबेडकर हॉल येथे मीटिंग झाली
यात विविध जाती धर्मातील पदाधिकारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.