गर्भपात केंद्रांना एका प्रकारे दिवाळी भेट.. गर्भलिंग निदान करणाऱ्यांचे आले अच्छे दिन?
पुणेकरांमध्ये नाराजगीचे सुर, कार्यभार परत न दिल्यास समाजिक कार्यकर्ते करणार आयुक्तांच्या दालनात आंदोलन,
बेटी बचावो नाहितर बेटी पढावो कुठून ?
सजग नागरिक टाईम्स : पुणे शहरातील अनेक सोनोग्राफी केंद्रांची तपासणी करून दोष आढळलेल्या केंद्रांवर कारवाईचा बडगा उगारणारे पुणे महानगरपालिकेतील सहाय्यक आरोग्य प्रमुख Dr.vaishali jadhav यांची अचानक पणे बदली करून गर्भपात केंद्रांना एका प्रकारे दिवाळी भेट दिली आहे.
त्यांच्या बदली मुळे गर्भपात केंद्र चालविणाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असले तरी पुणेकरांमध्ये नाराजगीचे सुर उमटत आहे .मध्यंतरी जाधव यांना हटविण्यासाठी मोठ्ठी फिल्डिंग लागली होती तर काहि दिवसा पूर्वी रेडोलाॅजिस्ट यांनीही संप पुकारला होता.
त्यांच्या संपाला न घाबरता डॉ . वैशाली जाधव यांनी कारवाई व तपासण्या सुरूच ठेवलेल्या होत्या त्या संदर्भात एका महिला आमदाराने आकसापोटी तत्कालीन पुणे महानगरपालिका आयुक्त कुणाल कुमार कडे तक्रारीही केल्या होत्या त्या तक्रारीचीही परवा न करता कुणाल कुमार यांनी तपासण्या सुरूच ठेवण्याचे सांगितले होते .
कारण Dr.vaishali jadhav हे करत असलेल्या तपासण्या हे समाजासाठी व मुलींना वाचवण्यासाठी खुप महत्वाचे होते परंतु पुणेकरांचे दुर्दैव, आयुक्त बदलताच सौरभ राव यांनी चार्ज घेताच पुणे महानगरपालिका मधील आरोग्य खात्यातील अधिकारींमध्ये राजकारण सुरू झाले .
डॉ .वैशाली जाधव हे सिनीयर्स असुन त्यांच्याकडून Pcpndt चे कामकाज काढून घेण्यासाठी लाॅबी तयार झाली होती, जे कामकाज कुणाल कुमार यांना काढायला जमले नाही ते काम सौरभ राव यांनी करून दाखवल्याने पुणेकरांनी आयुक्तांच्याच कार्यक्षमतेवर प्रश्न चिन्ह निर्माण केले आहे?
एप्रिल ते ऑगस्ट पर्यंत गर्भपात केंद्रांच्या तपासण्यामध्ये मोठ्या प्रमाणावर त्रुटया सापडल्याने केंद्र चालकांचे धाबे दणाणले होते त्यात कदाचित गुन्हे ( FIR) देखील दाखल झाल्या असत्या परंतु सदरील प्रकरणे बाहेर पडू नये यासाठी कार्यभार काढून घेण्याचा फास आवळण्यात आला.
जाधव याच्या कार्यकाळात त्यांनी 35 केसेस दाखल करून त्यातील 6 डाॅकटरांपैकि काहि जणांना 1 वर्षाची तर काहींना 6 महिन्यांची शिक्षा देखील झाली आहे. त्यात आपण भरबटले जाऊ नये यासाठी मोठी फिल्डिंग लावून दिवाळीच्या सुट्या पडण्याअगोदरच पुणे महानगरपालिकेतील अतिरिक्त आयुक्त शितल उगले तेली यांनी डॉ .वैशाली जाधव यांच्याकडील कार्यभार काढून घेण्याचे आदेश शनिवारी रात्री काढले, या सर्व प्रकाराची दखल पुण्यातील समाजिक कार्यकर्ते यांनी घेतली असुन दिवाळी नंतर आयुक्तांच्या दालनात आंदोलन करण्याचा ईशारा लोकहित फाऊंडेशन पुणे व विविध संघटनांनी दिला आहे .