Homeताज्या घडामोडीस्वयंघोषित गोरक्षकावरून हायकोर्टाने राज्य सरकारला बजावली नोटीस .

स्वयंघोषित गोरक्षकावरून हायकोर्टाने राज्य सरकारला बजावली नोटीस .

२४ तास हेल्पलाईन सुरु करण्याची मागणी

मुंबई:गोमांस बाळगण्याच्या अथवा खात असल्याच्या संशयातून ,

स्वयंघोषित गोरक्षकाकडून सामान्य नागरिकांवर हल्ले होत असून नागरिकांच्या संरक्षणासाठी २४ तास हेल्प लाईन सुरु करावी

अशी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती .

त्याच्या सुनावणीत हायकोर्टाने राज्य सरकारसह पोलीस महासंचालक व पोलीस आयुक्तांना नोटीस बजावली आहे.

२४ तास हेल्पलाईनसह प्रत्येक पोलीस ठाण्यात परिसरातील गोरक्षकांची यादीही उपलब्ध असावी

हि विनंती सामाजिक कार्यकर्ते शादाब पटेल यांनी न्यायालयात केली होती.

न्यायमूर्ती भूषण गवई व मकरंद कर्णिक यांच्या खंडपिठापुडे सुनावणी झाली.

गोमांस बाळगण्याच्या अथवा खात असल्याच्या संशयातून , स्वयंघोषित गोरक्षकाकडून सामान्य नागरिकांवर अनेक हल्ले झाले आहेत .

बकरी ईदच्या काळात हे हल्ले आणखीनच वाढण्याची भीती आहे.

२४ तास हेल्पलाईनसह प्रत्येक पोलीस ठाण्यात परिसरातील गोरक्षकांची यादीही करण्याचे निर्देश द्यावेत

व नागरिकांच्या सुरक्षेसाठी राज्य सरकारला मार्गदर्शक तत्वे आखण्याचे निर्देश हि देण्यात यावे

अशी विनंती सामाजिक कार्यकर्ते शादाब पटेल यांनी न्यायालयात केली आहे .

Share Now
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular