एका पावसात M.S.E.B ची वीज गेली वाहून

एका दिवसाच्या पावसात महावितरण च्या कारभाराचा अंधार उजेडात
सनाटा प्रतिनिधी :पुणे शहरात काल एक दिवस ५० मिमी पाऊस झाला आणि पुण्याच्या अनेक भागात बत्ती गुल झाली विशेषतः NIBM Rd. ; कोंढवा ;हडपसर, वानवडी वगैरे भागात तर १६-२४ तास वीज गायब झाली. गेल्या वर्षी जुलै महिन्यात औंध;बाणेर; बालेवाडी या स्मार्ट सिटी भागात ४५-६० तास वीज गायब झाली होती ; त्या नंतर महावितरणने आश्वासन दिले होते कि यंदा पुण्यात असा अनुभव परत येणार नाही ; परंतु यंदा सुद्धा बालेवाडी मध्ये जुलै महिन्यात १८-२४ तास बत्ती गुल झाली होती ; त्यानंतर बऱ्याच  दिवसांनी पावसाचे पुनरागमन झाल्याबरोबर हाच अनुभव या स्मार्ट सिटी मधील नागरिकांना येतो हि महावितरण साठी अत्यंत लज्जास्पद गोष्ट आहे.

फक्त ६१९ रुपयात गोल्ड प्लेटेड नेकलेस अधिक माहितीसाठी यालींकवर क्लिक करा 

दर महिन्यात किमान दोन गुरुवारी दिवसभर वीजपुरवठा बंद ठेऊन महावितरणची  खाते तथाकथित देखभाल दुरुस्ती ची कामे करते ती काय लायकीची होतात ते अशा वेळी उघड होते. खरे तर मुंबई सह जगातील कोणत्याच स्मार्ट शहरात आठवड्यातून एक दिवस काही तास वीजपुरवठा बंद करून देखभाल दुरुस्ती करण्याची वेळ येत नाही ; पण पुण्यातील नागरिक सहनशील असल्याने ते हा प्रश्न विचारात नाहीत ; पण निदान इतर दिवशी तरी अखंडित वीजपुरवठा मिळावा अशी अपेक्षा त्यांनी ठेवली तर त्यांचे काय चुकले ? महावितरण (पुणे ) आणि पाऊस यांची काय दुष्मनी आहे काही कळत नाही ; कारण मुंबई ; कोंकण ; महाबळेश्वर सह अनेक ठिकाणी पुण्याच्या किती तरी पट जास्त पाऊस पडून हि तेथील  वीज जात नाही.

Advertisement

 

आमच्या अधिक बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वर क्लिक् करा

पुणे शहर राज्यातील सर्वाधिक ग्राहक संख्या असलेले शहर आहे ; या शहरातून महावितरणला राज्यातून सर्वात जास्त महसूल मिळतो आणि राज्यातील सर्वात कमी वीजगळती पुण्यात आहे ; तरीही ग्राहक सेवेकडे महावितरण चे अक्षम्य दुर्लक्ष होते हा नेहमीचाच अनुभव आहे; किमान आता तरी आपण या विषयाकडे गांभीर्याने पाहावे ; ज्यांच्या हलगर्जीपणामुळे पुणेकरांवर अंधारात रहायची वेळ आली त्या कर्मचारी / अधिकारी यांचेवर कारवाई करावी ; ज्या नागरिकांना अनेक तास अंधारात राहावे लागले आहे त्यांना SOP नियमांप्रमाणे नुकसान भरपाई स्वताहून द्यावी आणि ती नुकसान भरपाई संबंधित कर्मचारी / अधिकारी यांच्या  पगारातून वसूल करावी अशी मागणी सजग नागरिक मंचचे विवेक वेलणकर,यांनी महावितरण पुणे झोनचे मुख्य अभियंता यांना एका पत्रा द्वारे केली आहे.

Advertisement

या लिंक वर क्लिक करून फेसबुक पेजला लाईक करूनही बातम्या मिळवू शकता 

Leave a Reply