Homeब्रेकिंग न्यूजखडक हद्दीतून आणखीन एक गुन्हेगार झाला तडीपार

खडक हद्दीतून आणखीन एक गुन्हेगार झाला तडीपार

पुणे शहरात गणेशोत्सव व बकरी ईदच्या काळात कोणतेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पुणे शहर पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला व सहाय्यक पोलीस आयुक्त रविंद्र कदम  यांच्या आदेशाने  पुणे शहरातील गुन्हेगारांना पुणे शहर व पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्याचे काम जोरदार चालू असल्याने खडक पोलिसांनीही त्यांच्या हद्दीतील अनेक सराईत गुन्हेगाराना तडीपार करण्याचा धडाकाच लावला असून अनेक  गुन्हेगार यापूर्वी तडीपार केले आहे.

वाचा .बी.जे.पी.भगाओ  देश बचाव’रॅलीस उत्स्फूर्त प्रतिसाद

वाचा;     इ चलनामुळे वाहतूक पोलीस व नागरिकांचे वाढले ताण

हा आकडा या महिन्यात २० पर्यंन्त पोहोचत असल्याने अनेक गुन्हेगार भीती पोटी त्यांच्या बिळात जाऊन लपले आहे.खडक हद्दीत सद्यातरी शांतता दिसत आहे .आज  सराईत गुन्हेगार स्वप्नील सुनील हराडे,वय २२, रा .८९ घोरपडे पेठ यालाहि दोन वर्षासाठी पुणे शहर व पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. यावर अनेक गंभीर प्रकारचे गुन्हे आहे ,दरोड्याचा एक ,चोरिचा एक ,अग्निशस्त्र जवळ बाळगल्याचा एक ,दुखापती करण्याचा एकअसे एकूण चार गुन्हे दाखल असून ,या पूर्वी त्याच्यावर  शांतता भंग होऊ नये म्हणून प्रतिबंधक कारवाई करण्यात आली असून हि त्याच्यात काहीही परिवर्तन झाले नसल्याने त्यास २८/८/२०१७   पासून   दोन वर्षासाठी पुणे शहर व पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्यास आले आहे.

वाचा खडकमधील इतर तडीपार ची लिस्ट ‘सन 2017 खडक पोलिसांनी गुन्हेगार तडीपार केले 17

सदरील कारवाई शहर विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त बाजीराव मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली खडक पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी ,पोलीस निरीक्षक (गुन्हे )संभाजी शिर्के,पोलीस  उप निरीक्षक आनंत व्यवहारे ,पोलीस  उप निरीक्षक संजय गायकवाड,पोलीस कर्मचारी राजन शिंदे ,सर्फराज शेख,महेश बारवकर ,महेश  कांबळे ,अनिकेत बाबर ,समीर सावंत ,यांनी सदरील कारवाईस सहभाग  घेतला असल्याची माहिती मिळाली .

या लिंक वर क्लिक करून फेसबुक पेजला लाईक करूनही बातम्या मिळवू शकता

 

Share Now
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular