पुणे : राजस्थान वरून गुजरात मधील बनासकांठातील पूर ग्रस्त नागरिकांना भेटण्यासाठी गेलेल्या अखिल भारतीय कांग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष खा. राहुल गांधी यांच्या गाडीवर आज शुक्रवारी दगड फेक करण्यात आली .पार्टी नेता रणदीप सर्जेवाल म्हनाले कि राहुल गांधी यांच्या गाडीवर झालेल्या हमल्या नंतर त्याच्या गाडीचे काचा फुटले असून पोलीस तपास करत आहे कि कोणी दगडफेक केले आहे .यापूर्वी देखिल बनासकांठा मध्ये त्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले होते. गुजरात मधील बनासकांठातील पूर ग्रस्त नागरिकांना भेटण्यासाठी गेलेल्या अखिल भारतीय कांग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष खा. राहुल गांधी यांना नागरिकांचा विरोधा सह काळे झेंडे दाखवण्यात आले व पंतप्रधान नरेंद्र मोदि यांच्या बाजूने (पक्षात )नारे बाजी देखिल केली .यांच्या विरोधामुळे खा. राहुल गांधी यांना परत फिरून जावे लागले असून या दरम्यान त्यांच्या कारवर दगडफेक करण्यात आली .असल्याने पुणे शहर काँग्रेसतर्फे शहर अध्यक्ष रमेश बागवे यांच्या मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय कांग्रेस पार्टी च्या सर्व पदाधिकारी व सदस्यांतर्फे.या घटनेच्या निषेधार्थ बालगंधर्व चौकात आंदोलन करण्यात आले, यावेळी काँग्रेस शहर अध्यक्ष रमेश बागवे,नगरसेवक अरविंद शिंदे ,अभय छाजेड .महेबूब नदाफ विलास लांडे व इतर पदाधिकारी उपस्थित होते .