ब्रेकिंग न्यूज

गोळीबार करणाऱ्या फरार आरोपीस पुणे पोलिसांनी नेपाळ बॉर्डर वर केले अटक

Advertisement

पुणे शहरातील पिंपळे गुरव येथे २४ जून रोजी एका बांधकाम व्यावसायिका वर गोळीबार करून गुन्हेगार फरार झाले होते .त्या सर्व गुन्हेगांचा शोध पोलीसान तर्फे जोरात सुरु होता .गोळीबार करणारे आरोपिंना गुन्हे शाखा  ४ च्या पोलिसांनी हैदराबाद येथून अटक केले .पिंपळे गुरव भागामध्ये राहणारे बांधकाम व्यावसायिक योगेश शंकर शेलार, वय .३५ रा .अग्रेशिया सोसायटी .पिंपळे गुरव हे  २४ जून रोजी सकाळी ११.३० वाजता तुळजा भवानी मंदिरामध्ये दर्शनासाठी गेले असता पल्सर  मोटर सायकलवर येऊन डोक्यावर हेल्मेट घातलेल्या  दोन अनोळखी इसमांनी पिस्तुलासह येऊन त्यांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्यांवर गोळीबार करून पसार झाले होते .या बद्दल सांगवी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आले होते .योगेश शंकर शेलार हा अदिती गायकवाड हिचे वडील कैलास गायकवाड यांच्या कामात जास्त हस्तक्षेप करत असल्याने व योगेश ची बहिनि सोबत  कैलास गायकवाड यांचे प्रेम संबंध असल्याने अदिती व योगेश मध्ये नेहमी वाद होत होते .फेब्रुवारी २०१७ च्या निवडणुकीत कैलास गायकवाड हे कॉंग्रेसच्या तिकिटावर निवडणुक लढवत होते.अदिती व तिचा मामे भाऊ सौरभ शिंदे कैलास गायकवाड यांना निवडणुकीचे काम पाहून  मदत करत होते.प्रचार दरम्यान अदिती व योगेश शेलार यांच्यात वाद झाला होता . निवडणुकीत कैलास गायकवाड यांचा पराभव झाल्याने योगेशने अदितीला इतर कार्यकर्त्यांसमोर अपमानित केले.हि बाब आदितीला जिव्हारी लागल्याने अदितीने योगेशचा काटा काढण्याचे ठरविले यासाठी त्याने तिचा मामे भाऊ सौरभ शिंदे याची मदत घेतली . सौरभ शिंदेने त्याचे साथीदार प्रणव गावडे व आशितोष उर्फ बंटी मापारे यांना सोबत घेऊन योगेशला जीवे ठार मारण्याचा कट रचला त्यानुसार सौरभ शिंदेने त्यांचा  जुन्या ओळखीचा गुन्हेगारी प्रवृत्तीचा अनिकेत उर्फ बंटी जाधव रा.भूईज ,तालुका वाई जिल्हा सातारा याच्याशी संपर्क साधून सदरील कट पूर्ण करण्याचे  नियोजन केले .व त्याकरिता त्यास 5 लाख रुपये देण्याचे ठरले .योगेशच्या हालचालीवर लक्ष ठेवण्याचे काम साथीदार आशितोष उर्फ बंटी मापारे यास दिले.या कामा करिता अदितीने पैसे पुरविले होते .त्यानंतर अनिकेत उर्फ बंटी जाधव याने त्याच्या चार साथीदार सोबत पुण्यात येऊन योगेश वर गोळीबार केला व फरार झाले .सदर गुन्ह्यात अदिती गायकवाड , सौरभ शिंदे, आशितोष उर्फ बंटी मापारे,प्रणव गावडे यांना यापूर्वीच अटक करण्यात आले होते .व पुढील तपास गुन्हे शाखा  ४ कडे वर्ग करण्यात आला होता .गुन्हे शाखेने आरोपी बंटी जाधव ,अक्षय शेवते वय .२३ ,अक्षय संजीव जाधव वय .१९ .गिरीष दिलीप दळवी वय २० ,मिथुन मोहन घाडगे वय २४ सर्व  रा. भूईज ,तालुका वाई जिल्हा सातारा यांना हैदराबाद येथून अटक करण्यात आली असून त्यांच्या कडून गुन्ह्यासाठी वापरलेले दोन पिस्तुल ,इतिओस कार ,वेगनार कार व तीन दुचाकी असा एकूण १४.००.०००/माल जप्त करण्यात आला आहे .सदरची कारवाई गुन्हे शाखेचे अप्पर पो.आयुक्त प्रदीप देशपांडे ,पोलीस उपायुक्त पंकज डहाने ,सहा.पोलीस आयुक्त संजय निकम ,यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा  ४चे पोलीस निरीक्षक राजेंद्र तोडकर , सहा.पोलीस निरीक्षक नितीन भोयर , सहा.पोलीस निरीक्षक गणेश पाटील , पोलीस उप निरीक्षक नलावडे,पोलीस कर्मचारी सलीम शेख ,डिसुजा .राजेंद्र शेटे व इतर कर्मचारींनी मिळून केली.

 

 

Share Now

Leave a Reply