पाटणा मधील ऐतिहासिक गांधी मैदानात राष्ट्रीय जनता दलाच्या बी .जे.पी.भगाओ देश बचाओ ’महारॅलीस लालू प्रसाद यादव यांच्यासहित विरोधी पक्षाचे अनेक नेते एकाच व्यासपीठावर एकत्र आले.समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव,पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ,जेदियुचे शरद यादव यांनीही या महारॅलीत सहभाग घेतला.
या महारॅलीत लालू प्रसाद यादवसमर्थकांनी मोठ्यासंख्येने गर्दी केली होती.कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी जरी या महारॅलीत उपस्थित नसल्या तरी त्यांनी मोबाईल वरून संभाषण केले ,धर्म व राजकारण जेव्हा एकत्रित येतो तेव्हा पाकीस्थान व इराक बनतो असे शरद यादव म्हणाले . बी .जे.पी ला वाटत असेल कि त्यांना कोणीही रोखू शकत नाही पण बिहारची जनता त्यांना रोखून धरेन असेही यादव म्हणाले . सोनिया गांधी चे ध्वनिमुद्रित संदेश ऐकवण्यात आले.ते म्हणाले कि सत्तेत बसलेल्यांना वाटत असेल कि जनतेला मूर्ख बनावून ठेवूया .सत्ताधारीनी तीन वर्षात लाखो लोकांना बेरोजगार केले आहे.अनेक मुलांनी रुग्णालयात आपला जीव गमावला आहे.उत्तर प्रदेशचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी मुख्यमंत्री नितीशकुमार व पंतप्रधान नरेंद्र मोदि यांच्यावर शब्दांचे हल्ले चढवले .
या लिंक वर क्लिक करून फेसबुक पेजला लाईक करूनही बातम्या मिळवू शकता