भाजपा-आरपीआय च्या नगरसेविका फरजाना आयुब शेख यांचे जाती प्रमाण पत्र जात पडताळणी समिती ने फेटाळले
येरवडा भागातील नगरसेविका फरजाना आयुब शेख यांनी सन २०१७ सालाच्या नगरसेवक पद साठी निवडणूक लढवली होती व जिंकून हि आले होते .निवडणूकीसाठी त्यांनी त्यांच्या माहेरी असलेल्या नावाने व माहेरच्या कागदो पत्रा वर निवडणूक लढवली असून त्यांनी निवडणूकीसाठी दर्जी (इ.मा.व.)या जातीचे असल्याचा दावा केला होता तो दावा जात पडताळणी समिती ने फेटाळले असून तो दाखला अवेध ठरवला आहे .उप जिल्हाधिकारी (भूसंपादन क्र .११)पुणे यांनी अर्जदार यांचे जातीचे मूळ प्रमाणपत्र जप्त करण्याची कार्यवाही करावी व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल समितीस सादर करण्याचे आदेश जात पडताळणी समिती ने दिले आहे .