सनाटा प्रतिनिधी;पुणे शहरातील वानवडी वाहतूक पोलिसाच्या अखत्यारीत येणारे अर्जुन रोड चौकातील सिग्नलवर झाडाची पाने आली असल्याने या रोडवरून येजा करणाऱ्या नागरिकांना वाहने घेऊन रस्ता ओलांडताना दररोज त्रास होत होते .अनेक नागरिकांना सिग्नल आहे कि नाही हे सुद्धा कळत नसल्याने वाहने घेऊन सिग्नल क्रॉस केल्यानंतर कळत होते यामुळे नागरिकांमध्येच तुतुमैमै कित्येक वेळा झालेली होती.
यावर उपाय शोधत वानवडी वाहतूक पोलिसाचे पोलीस निरीक्षक जे .एस.पठान यांच्या मार्गदर्शन खाली व पोलीस उपनिरीक्षक सी.बी.जगताप यांच्या मदतीने वानवडी वाहतूक पोलिसाच्या टीमने सिग्नलवर आलेले झाडाची पाने जे सी बी च्या वर चढून बाजूला हटवली जेणेकरून नागरिकाना होणारा त्रासही वाचला व झाडाची पाने हि बाजूला झाली. या कामासाठी वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक जे .एस.पठान व पोलीस उपनिरीक्षक सी.बी.जगताप,पोलीस हवालदार कुरळे , पोलीस नाईक जाधव, महिला पोलीस शिपाई अनारसे , पोलीस शिपाई रियाज शेख, पोलीस नाईक नाणेकर हे उपस्थित होते.
[ngg_images source=”galleries” container_ids=”17″ sortorder=”91,90″ display_type=”photocrati-nextgen_basic_thumbnails” override_thumbnail_settings=”1″ thumbnail_width=”400″ thumbnail_height=”580″ thumbnail_crop=”1″ images_per_page=”2″ number_of_columns=”3″ ajax_pagination=”1″ show_all_in_lightbox=”1″ use_imagebrowser_effect=”0″ show_slideshow_link=”1″ slideshow_link_text=”[Show slideshow]” template=”/home/sanata2836/public_html/wp-content/plugins/nextgen-gallery/products/photocrati_nextgen/modules/ngglegacy/view/gallery-caption.php” order_by=”sortorder” order_direction=”ASC” returns=”included” maximum_entity_count=”500″]