वाहतूक पोलिसात भ्रष्टाचार होत नाही:अँन्टी करप्शन विभागाचा फतवा

WEB HOSTING OFFERsajag-advertisement-offer
Advertisement
फिर्यादी :पोलीस हवालदार सुनील टोके

मुंबई :वाहतूक विभाग मुंबई येथे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी यांच्या संगनमताने चालणाऱ्या भ्रष्टाचार बाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल करून पोलीस हवालदार सुनिल भगवंतराव टोके न्याय मागत आहे दिनांक 12/7/2017 रोजी कोर्ट क्रमांक 3 मा.उच्च न्यायालयाने असे मत नोंदवले आहे की लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने या प्रकरणांत मुंबई वाहतूक पोलीस विभागात भ्रष्टाचार होत नाही हे असा लेखी अहवाल कोणत्या आधाराने सादर केला आहे तसेच याचिका कर्ते यांचे विनंती अर्ज,त्यांनी दिलेली व्हिडीओ ऑडिओ रेकॉर्डिग या पुराव्याचे आधारे काय चौकशी केली या बाबत विचारणा करून खुलेआम असा भ्रष्टाचार होत आहे हे सर्वांना माहीत आहे तसे आम्हांला सुध्दा दिसते आणि माहीत आहे या प्रकरणांत मा. न्यायालयाने आदेश दिले आहेत की मुंबई वाहतूक विभागाचे सह पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी या सर्व उपस्थित केलेल्या मुद्यांवर 3 आठवड्यात अफिडेवीट सादर करावे असे निर्देश दिले असल्याचे सुनिल भगवंतराव टोके यांनी सांगितले .

Advertisement

Leave a Reply