सजग नागरिक टाइम्स :घोरपडे पेठेत मुलीसोबत अश्लील वर्तन केल्या प्रकरणी जाब विचारण्यासाठी गेलेल्या नातेवाईकांना आरोपीने शिवीगाळ करत मारहण केली. हा प्रकार सोमवार सायंकाळी घडला . याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.जुबेर शब्बीर सय्यद (रा. घोरपडे पेठ) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी एका 48 वर्षीय महिलेने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या मानलेल्या भावाची मुलगी सोमवारी सायंकाळी रडत घरी आली. त्यावेळी घरच्यांनी तिच्याकडे रडण्याचे कारण विचारले असता जुबेर याने मुलीचा हात पकडून तिच्यासोबत अश्लील चाळे केले. तसेच तीला स्वच्छतागृहात घेऊन जाण्याचा प्रयत्न केला असल्याचे सांगितले . परंतु त्याच्या हाताला हिसका देवून तेथून पळून आल्याचे मुलीने सांगितले. याचा जाब विचारण्यासाठी पिडीत मुलीची आई आणि मावशी जुबेरच्या घरी गेले होते.त्यावेळी त्याने मुलीच्या आईला आणि फिर्यादीला शिवीगाळ करत मारहाण केली असल्याची तक्रार खडक पोलीस ठाण्यात देण्यात आली असून खडक पोलीस तपास करत आहेत.
खडक हद्दीत मुलीचा विनयभंग करून नातेवाईकांना मारहाण
RELATED ARTICLES