Homeब्रेकिंग न्यूजचेंडू काढताना शॉक लागून चिमुकल्याचा मृत्यू

चेंडू काढताना शॉक लागून चिमुकल्याचा मृत्यू

पुण्यातील खडकीत घरावरचा चेंडू काढताना शॉक लागून चिमुकल्याचा मृत्यू
दिनांक : ३० एप्रिल २०१७,

पुणे : खड़कीतील मरिआई माता परिसरात असणाऱ्या लुंबिनी कुंज बुध्द विहारच्या बाजूला रात्री पावणे दहा वाजण्याच्या सुमारास प्रितेश गणेश कांबळे हा क्रिकेट खेळत होता.
पुण्यातील खडकी परिसरात शनिवारी (दि. २९) रात्री पावणे दहाच्या सुमारास मित्रांसमवेत क्रिकेट खेळत असताना. घरावर गेलेला चेंडू काढताना ११ वर्षीय मुलाचा लोखंडी खांबाला हात लागून शॉक बसल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेची माहिती खडकी पोलिसांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खड़कीतील मरिआई माता परिसरात असणाऱ्या लुंबिनी कुंज बुध्द विहारच्या बाजूला रात्री पावणे दहा वाजण्याच्या सुमारास प्रितेश गणेश कांबळे हा क्रिकेट खेळत होता. त्याच दरम्यान त्या परिसरात राहणारे चंद्रकांत कांबळे यांच्या घरावर चेंडू गेला. त्या घराचे छप्पर हे पत्र्याचे होते आणि बाजूला एक लोखंडी खांब आहे. प्रितेश घरावर जाताना बाजूला असणाऱ्या खांबाला दोन्ही हाताने पकडले. तेवढ्यात त्याला शॉक बसल्याचे त्याच्या भावाच्या लक्षात येताच. त्याने झाडू मारून बाजूला काढले आणि त्वरीत जवळील खडकी कंटोन्मेंट रूग्णालयात नेले. डॉक्टरानी त्याला मृत घोषित केले, अशी माहिती पोलिसांनी दिली. परिस्थिती लक्षात घेऊन रूग्णालय परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला होता. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत परिसरात शोकाकूल वातावरण आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular