लेख

तलाक नंतर काय ?

Advertisement

नोवेम्बर 2015 तारीख नक्की आठवत नाही पण शनिवार ची रात्र 12.30 च्या सुमारची वेळ , मी शंकरशेठ रोड वरुन घोरपडे पेठ च्या दिशेने एकबोटे कॉलनी मधून एक रस्ता जातो त्या वरून जात होतो , लाइट असून नसल्या सारखी आणि तेथे बोहरी कबरस्तान च्या समोर थोड़े सुनसान असलेल्या भागात एक बुरखा परिधान केलेली स्त्री आणि एक पुरुष थांबलेले , ती स्त्री रडत अश्रु पुसत होती आणि तो पुरुष खाली मान करुन तिची बोलणी ऐकत होता …
मी माझी दुचाकी वेग कमी करत थोड़े पुढे जाऊन बाजूला घेतली .. मागे वळून त्या पुरुषाला आवाज दिला ” क्या हुआ भाई कुछ परेशानी है क्या ? इतनी रात मे कब्रस्तान के बाहर क्या कर रे ?”
तो एकदम बिचकला ” कुछ नहीं … बात कर रहे है …”
ती स्त्री त्याला म्हणू लागली ” पूछो ना जा कर … कब तक छुपायेंगे ?” आणि तिने अक्षरशः त्याला ओढुन माझ्या समोर आणला , माझ्या पांढर्या व्हेस्पा गाडीवर काळ्या रेडियम ने कोर्टात पार्किंग साठी गरजेचे असलेले “Advocate” लिहिलेले स्टिकर रात्रीच्या मंद प्रकाशात चांगलेच चमकत होते … ते पाहून तो म्हणाला ” आप वकिलसाहब है क्या ?” मी होकार देत गाडी साइड स्टॅंड ला लावली आणि बाजूला उभा राहिलो ..
त्याने जवळ येत मला त्याचा वर्षभरा पूर्वी रागाच्या भरात घटस्फोट  झाल्याचे सांगितले , आणि दोघांचे त्यानंतर देखील परस्परांवर प्रेम आहे म्हणून ते दोघे असेच कुठे ही भेटतात, घरचे लोक भेटु देत नाहीत असे म्हणू लागला , त्याला मी म्हणालो “तुम को  करने का क्या है ?”
” फिर से साथ में रहने का है … मगर …” – तो
“मगर क्या ?”
“नहीं… वो … लोग बोलते .. बीवी को दूसरे से शादी करा के फिर बादमे शादी करना पड़ती ….” अड्खळत तो बोलू लागला …
मी म्हणालो “तलाक के कागज़ है क्या ?” तो म्हणाला है गाडी के डिक्की मे ही रहते हमेशा …” आणि पळत जाउन घेऊन आला ..
100 रुपयांच्या स्टॅम्प पेपर वर थोडा मजकूर लिहून खाली लिहिले होते … खुला नामा
 ×××× तुम्हारे  मांगने पर मै xxxxx तुम को तलाक देता हु …
आणि हेच तीन वेळा पुन्हा पुन्हा
मी एकदम म्हणालो अरे ये तो खुलानामा है .. ये तलाक नहीं है ..

Advertisement

तो एकदम आश्चर्यचकित झाल्या सारखे माझ्या तोंडा कड़े पाहत म्हणू लागला ” उस मे तो तलाक लिखा है ”
मी त्याला म्हणालो ” तुम को कौन बोला ?” तर एका महिला कार्यकर्तीचे नाव घेऊ लागला .. और हमलोग  पेपर मे भी तो पढ़ते रहते ना वकील साहब ..
मी त्याला म्हणालो ” तुम्हारी शादी कौन लगाया पेपरवाला या कार्यकर्ती ?” तर त्याने हसून एका मस्जिद च्या इमाम साहेबाचे नाव घेतले ..
“उन को क्यों नहीं पूछा ये करते वक्त ?”
त्याला कार्ड देऊन दुसऱ्या दिवशी रविवारी माझ्या ऑफिस ला बोलावले..
ते दोघे आले मी त्याच इमाम साहेबांना बोलावून घेतले होते ,
त्यांना ते पेपर दाखवून खात्री करुन घेतली …
त्याच्या नातेवाइकांना देखील बोलवुन घेतले ..
एका स्टॅम्प पेपर वर दोघांचे शपथपत्र लिहून घेतले ,” यापुढे विनाकारण भांडणार नाही , भांडलो तरी तलाक देणार नाही / आणि यातील साक्षीदार आणि इमामसाहेब यांच्याशी चर्चा केल्याशिवाय तलाक दिला तरी तो ग्राह्य ठरणार नाही”
अशा अनेक अटी लावून दोघांच्या सह्या घेतल्या ..
इमामसाहेबांनी पुन्हा लग्न लावले ..
त्याला त्याच्या पत्नीला पुन्हा मेहेर ची रक्कम द्यायला लावली …
(नोट : शरीयत आणि  भारतीय मुस्लीम पर्सनल लॉ  दोन्ही मधे हीच तरतूद आहे )
तो फी वीचारु लागला तर ” दोनों अच्छे से रहो यही फी है !”
असे म्हणत मी सर्वांना चहा पाजुन रवाना केले , इमामसाहेबांनी  देखील सम्पूर्ण सहकार्य केले  एक पैसा देखील घेतला नाही …
ती मुलगी आणि तीच्या घरच्यांचा आनंद अवर्णनीय होता ..
अनेक वेळा त्यांनी जेवणाचे आमंत्रण दिले पण जाउ शकलो नाही …
काल संध्याकाळी तो एकदम खुशीत जिलेबिचा डब्बा घेऊन आला होता ” बेटी  हुई है वकील साहब”
 मी जिलेबी ठेवून घेतली आणि ” पेढ़े ले कर आ रे कंजूस जातिवाद करता क्या ख़ुशी मे भी “असे हसत  म्हणालो..
तर आज सकाळी सकाळी तो पेढ़े घेऊन हजर झालेला ..
“सुख से रहो और जिस  को कानून समझता उससे ही मशवरा किया करो.. “असे म्हणत मी त्याला देखील पेढा भरवून रवाना केला ..
आणि आजचा सकाळ वाचायला घेतला  तर हेडलाइन ” तलाक चे राजकारण  करू नका – मोदी ”
आणि मी पोस्ट टाकायला घेतली ..

एड.समिर शेख

Share Now

Leave a Reply