ताज्या घडामोडी

‘त्या’ वाहतूक पोलिसावर डेक्कन पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल.

Advertisement

पुणे – पुणे शहरातील कर्वे रस्त्यावर वाहतूक नियमन करताना  दुचाकीचालकाने मारहाण केलेल्या ‘त्या’ पोलीस हवालदार रवींद्र इंगळे विरुद्ध डेक्कन पोलीस स्टेशन मध्ये विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, याबाबत एका वीस वर्षांच्या मुलीने तक्रार दिली आहे.

आमच्या अधिक बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वर क्लिक् करा 

Advertisement

मिळालेल्या माहितीनुसार, रवींद्र इंगळे (डेक्कन वाहतूक विभाग, पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या वाहतूक पोलिसाचे नाव आहे. याबाबत फिर्यादी मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार, बुधवार (दि.१६) दुपारी साडेबाराच्या सुमारास फिर्यादी आपल्या वडिलांबरोबर मोटारसायकलवरून जात असताना, पोलीस हवालदार रवींद्र इंगळे याने मुलीच्या वडिलांची मोटारसायकल अडवून, त्यांच्याकडे वाहनचालक परवान्याची मागणी केल्यानंतर, त्यांच्यामध्ये वाद झाला होता .मात्र वडील आणि पोलिसात काय वाद झाला, हे त्या मुलीला समजले नव्हते . त्यावेळी पोलीस हवालदार इंगळे यांनी मुलीला आणि तिच्या वडिलांना मारहाण करून, मुलीला मागे ढकलून देऊन, तिचा विनयभंग केला असल्याबाबत त्या मुलीने पोलीस हवालदार रवींद्र इंगळे यांच्या विरुद्ध डेक्कन पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दिली असून. त्यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही.नागरिकान कडून जर एखादी चूक पण झाली तर कोणतीही  सविस्तर चौकशी न करता तत्काळ अटक केली जाते .पण एखाद्या सरकारी अधिकारी व कर्मचारीने गुन्हा केल्यास त्याची  चौकशी करत असल्याचे वरिष्ठ अधिकारी म्हणतात व जसे वातावरन थंड  होते तेव्हा या सरकारी अधिकारी व कर्मचारीना मोकळे सोडल्याचे अनेक उदाहरण असल्याचे नागरिकांना  अनुभव आहे.   सदरील प्रकरणाचा डेक्कन पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक दिपाली जाधव तपास करत आहेत.

      या लिंक वर क्लिक करून फेसबुक पेजला लाईक करूनही बातम्या मिळवू शकता 

 

 

Share Now

Leave a Reply