धनंजय देसाईचा जामीन अर्ज फेटाळला:मोहसीन शेख खून प्रकरण :

सनाटा न्युज ; सन २०१३ मध्यें महा पुरूषाची फेसबुकवर बदनामी केल्या प्रकरणी  हडपसर मध्ये दंगल उसळली होती .हिंदू राष्ट्र सेनेचा प्रमुख धनंजय देसाई यांने  चितावणी देणारे प्रभोक्षक भाषण केल्यामुळे हडपसर भागात दंगल उसळली असल्याचे पोलीस तपासात सिद्ध झाल्याने त्याला हडपसर पोलिसांनी त्याच्या साथीदारांसह अटक केले होते .या दंगलीत इजिनिअर मोहसीन सादिक शेख वय 26 वर्षे या निष्पापाचा खुन करण्यात आला होता.त्या दिवसा पासुन धनंजय जयराम देसाई हा येरवडा कारागृहात आहे. वैघकिय औषध उपारासाठी जामिन मिळावा या साठी  देसाईने जिल्हा न्यायाधिश यांच्या कडे जामिन अर्ज केला होता .त्याची आज दि 3 ऑगस्ट 2017 रोजी सुनावणी झाली सुनावणीत देसाईची जामिन अर्ज रद्द व्हावा अशी जोरदार मागणी सरकारी वकिल यांनी केली .तसेच जामिन मिळाल्यास देसाई हा पुराव्यानिशि छेडछाड करू शकतो असा युक्ती वाद सरकारी वकिल यांनी केला याची दखल घेत जिल्हा न्यायालयाने जामिन अर्ज फेटाळून लावला.

Support our journalism - Support Sajag Nagrikk Times

Leave a Reply