पुणे शहरातील चंदनाची झाडे चोरणारे पोलीसांच्या जाळयात….
सनाटा प्रतिनिधी : पुणे शहर गुन्हे शाखेतील संघटीत गुन्हेगारी पथक दक्षिण विभागा मध्ये कार्यरत असणारे पो निरिक्षक राम राजमाने व त्यांचे कर्मचारी अवैध धंदयावर प्रतिबंधक कारवाई करणेकामी पेट्रोलिंगवर फिरत असताना परमार चेंबर्स समोर साधु वासवानी चौका जवळ दोन जन चंदनाची लाकडे पोत्यात भरून विक्री करण्यासाठी थांबले आहेत अशी बातमी कळताच राजमाने यांनी सापळा रचून दोन जणांना ताब्यात घेतले विष्णू विठ्ठल गायकवाड वय 32 .किसन लक्ष्मण गायकवाड वय 35 .दोघेही राहणार अहमदनगर यांच्या कडून चंदनाची झाडे व हत्यारे जप्त करून कारवाई करण्यात आली आहे व तसेच त्याची पोलीस कस्टडी रिमांड घेऊन दत्तवाडी पो,स्टेशन ,बंडगार्डन पो.स्टेशन .शिवाजीनगर पो.स्टेशनच्या हद्दीत केलेले ५ गुन्हे उघडकीस आणले तसेच त्यांच्या कडून 1 लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला .सदरची कामगिरी गुन्हे शाखेचे प्रदिप देशपांडे, पोलीस उपायुकत पंकज डहाणे, सहाय्य पोलीस आयुकत सुरेश भोसले, व ईतर अधिकारी व कर्मचारी यांनी मिळून केल्याची माहिती मिळाली .