सनाटा प्रतिनिधी:पुणे – आजच्या या युगात जेथे सरकारी कामे ही फक्त काम समजून खांद्यावरचा बोझा काढण्यासाठी वा पैसे कमविण्यासाठी केलेल्रे दिसते. तेथे आपल्यां कामाला काम न समजता एक कर्तव्य समजून पार पाडणारे क्वचितच दिसतील. या क्व्चीता पैकीच पुण्यातील फायरब्रिगेडचे जवान आहे ते कोणतेही कारण न देता आपले सर्व कर्तव्य प्रामाणिकपने बजावताना पुणेकरांना नेहमी दिसतात. जीवाची बाजी लाऊन आगीत उतरून एखाद्याचे जीव वाचवणे व आगीवर नियंत्रण मिळवणे हे खरेच जिगरबाज लोकांचे कामे असत्तात .
काल दुपारी चारच्या सुमारास सातारा येथील महामार्गानजीक असलेल्या लिंबगाव फाटा येथे हॉटेल सोहम याठिकाणी किचनमधे तेलाचा भडका होऊन आग लागली. आग लागताच नागरिकांनी सातारा नगरपालिकेच्या अग्निशमन दलाशी संपर्क करुन मदतीची मागणी केली. परंतू , लिंबगावापासून नगरपालिकेचे अग्निशमन केंद्राचे अंतर बरेच असल्याने मदत पोहोचण्यास वेळ लागेल असे वाटल्याने तेथील नागरिकांनी आरडाओरडा करण्यास सुरवात केली. त्यावेळी साताऱ्याच्या आणेवाडीचा रहिवाशी असलेला पुणे अग्निशमन दलाचा जवान राजीव टिळेकर हा नुकताच दिवाळीची सुटी नसल्याने थोड्या वेळाकरिता कुटूंबियांना भेटण्यासाठी गावी गेला होता व हा जवान आग लागलेल्या ठिकाणाहून पाचच मिनिटाच्या अंतरावर होता. तिथे अचानक त्याला त्याच्या मित्राने फोन करुन आग लागल्याची बातमी दिली. जवान टिळेकर यांनी क्षणाचाही विलंब न करता आगीच्या ठिकाणी धाव घेतली.इतर सर्व खात्यात एक काम करण्याआसाठी 10 वेळा संपर्क साधल्यानंतर कामगार येतात काम केल्यानंतर उपकाराची भाषा वापरत चहापानाच्या नावावर नागरिकानकडून पैसे उकळतात जसे कि यांना शासन पगारच देत नाही अश्या पद्धतीने हे वागतात .पण फायरब्रिगेड च्या जवानांची बातच वेगळी.
हेपण जरूर वाचा ;पहा सिग्नलवरील झाडाची पाने हटवण्यासाठी वाहतूक पोलिसाची नवीन शक्कल
पूर्ण फोटो पहा.
[ngg_images source=”galleries” container_ids=”18″ sortorder=”92,94,93,95,96″ display_type=”photocrati-nextgen_basic_thumbnails” override_thumbnail_settings=”1″ thumbnail_width=”240″ thumbnail_height=”160″ thumbnail_crop=”1″ images_per_page=”5″ number_of_columns=”0″ ajax_pagination=”1″ show_all_in_lightbox=”1″ use_imagebrowser_effect=”1″ show_slideshow_link=”1″ slideshow_link_text=”[Show slideshow] आणखी फोटो पहा ” template=”/home/sanata2836/public_html/wp-content/plugins/nextgen-gallery/products/photocrati_nextgen/modules/ngglegacy/view/gallery.php” order_by=”sortorder” order_direction=”ASC” returns=”included” maximum_entity_count=”500″]
जवान टिळेकर हे हॉटेल सोहम येथे पोहचताच त्यांना किचनमधे आग भडकत असल्याचे दिसले. त्यांनी लगेचच हॉटेलमधे प्रवेश करण्याचा प्रयत्न करताच त्यांना स्थानिक पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीने मज्जाव केला. त्याचवेळी जवान टिळेकर यांनी पुणे अग्निशमन दलाचा मी एक जवान असल्याचा पुरावा म्हणून पोलिसांना ओळखपत्र दाखवत नगरपालिकेची फायरगाडी येईपर्यंत शक्य तेवढा प्रयत्न करु असे सांगितले. जवान टिळेकर यांची ओळख पटताच पोलिसांनी त्यांना काळजी घेण्याच्या सुचना देत आगीवर नियंत्रण मिळवण्याकरिता पुढे जाण्याची परवानगी दिली.
जवान टिळेकर यांच्या धाडसाची व चतुराईची हिच वेळ… कारण ना फायरगाडी ना तिथे आग वि्झवण्याचे कुठलेच साधन… ! मग त्यांनी धाडसाने जोखीम स्वीकारत पुणे अग्निशमन दलाच्या “त्राणाय सेवामहे” या ब्रीदवाक्यानुसार आग लागलेल्या किचनमधील तीन सिलेंडर आत जाऊन एकट्याने बाहेर काढले. तसेच किचनने पेट घेतलेल्या ठिकाणी स्थानिक नागरिकांच्या मदतीने बादलीच्या साह्याने पाण्याचा मारा करत आग नियंत्रणात आणली. त्याचवेळी सातारा नगरपालिका व एका साखर कारखान्याची फायरगाडी दाखल झाली. या आगीत हॉटेलचे नुकसान झालेच परंतू जवान टिळेकर यांनी दाखवलेल्या जिगरबाज कामगिरीमुळे जिवितहानी अथवा कोणी जखमी झाले नाही. कारण जर वेळेवर तीन सिलेंडर बाहेर काढले नसते तर सिलेंडरचे स्फोट होऊन मोठी दुर्घटना घडली असती.जवान राजीव टिळेकर यांनी केलेल्या कामगिरीने स्थानिक ग्रामस्थ व पोलिसांनी त्यांचे कौतुक केले व पुणे अग्निशमन दलाकडे असे जिगरबाज जवान असल्याचे हि त्यांनी नमूद केले.
[ngg_images source=”galleries” container_ids=”17″ sortorder=”91,90″ display_type=”photocrati-nextgen_basic_thumbnails” override_thumbnail_settings=”1″ thumbnail_width=”400″ thumbnail_height=”580″ thumbnail_crop=”1″ images_per_page=”2″ number_of_columns=”3″ ajax_pagination=”1″ show_all_in_lightbox=”1″ use_imagebrowser_effect=”0″ show_slideshow_link=”1″ slideshow_link_text=”[Show slideshow]” template=”/home/sanata2836/public_html/wp-content/plugins/nextgen-gallery/products/photocrati_nextgen/modules/ngglegacy/view/gallery-caption.php” order_by=”sortorder” order_direction=”ASC” returns=”included” maximum_entity_count=”500″]