पुण्यात हुकका पार्लर जोमात.. पोलीस प्रशासन कोमात..?

पुण्यात हुकका पार्लर जोमात.. पोलीस प्रशासन कोमात..?

सनाटा प्रतिनिधी : पुणे शहर आता smart city च्या नावाने ओळखले जात असले तरी पुणे शहाराच्या नावालाच काळीमा फासणारी घटना आजरोजी घडत आहे पुणे शहरातील विविध भागात गजबजलेल्या ठिकाणी राजरोस पणे हुकका पार्लर सुरू असुन हे  नशेचे सामान उघड पणे विकले जात असुनही पोलीसांकडून मात्र सोईस्कर दुर्लक्ष होताना दिसत आहे पुणे पोलीसांच्या आशिर्वादानेच सदरील हुकका पार्लर चालू असल्याने नागरिकांची व पालकांची डोके दुखी होऊन बसले आहे हुकयाचा नशा केल्या मुळे तोंडातुन वास येत नसल्याने तसेच कोणी ओळखू शकत नसल्याने तरूणाई या व्यसनाकडे दिवसेंदिवस ओढली जात आहे तसेच त्या हुकका मुळे पालकांन समोर मुलांच्या भविष्याचा प्रश्न चिन्ह निर्माण झाला आहे शहरात शिक्षणासाठी बाहेर गावा वरून येणार्या विध्यार्थीची संख्या वाढत असुन हुकका पार्लर चालवणाऱ्याचे धंदे  जोमाने सुरू आहेत हुकका पिणाऱ्यांन मध्ये सर्वाधिक संख्या हि विद्यार्थींची असल्याने पार्लर वाल्यांचे  साॅफ्ठ टार्गेट विद्यार्थीं होत आहेत.. पुणे शहरात चालू असलेल्या अंमली पदार्थांची तस्करी वर बाहेरच्या पोलीसांनी कारवाई करून अनेक वेळा दाखवली आहे तसेच पुणे पोलीसांन कडून सांगितले जाते कि कुठे चालू आहे हे हुकका पार्लर हे दाखवून द्यावे आम्ही कारवाई करू ..,, मग पगार फुकटचा घेता का? असा प्रश्न नागरिक विचारत आहे महणजे शासना कडून पगार हि घ्यायचा आणि हुकका पार्लर चालणार्या कडून 25000 हजार रूपये हपते हि घ्यायचे?   पोलीसांनी आता मांजरा सारखे डोळे बंद करून दुध पिणे बंद करावे? स्वताचे डोळे उघडून हुकका पार्लर वर कारवाई करून बंद करण्यात यावे स्वताच्या फायदासाठी विद्यार्थीं च्या जिवाशी खेळणे बंद करावे..
जर हुकका पारलरचे पत्ते पुणे पोलीसांना माहित नसेल तर लोकहित फाउंडेशन पुणे च्या वतीने हुकका पारलर  नाव, पत्ते सहित दाखवून देऊ असा इशारा फाउंडेशन चे अध्यक्ष अजहर अहमद खान यांनी दिला आहे..

Leave a Reply