Homeताज्या घडामोडीपुरुष होणार होता आई ? पुण्यातील हॉस्पिटलचा अजब रिपोर्ट

पुरुष होणार होता आई ? पुण्यातील हॉस्पिटलचा अजब रिपोर्ट

पुणे शहरातील नामांकित असलेले हॉस्पिटलने हे सिद्ध करून दाखवले आहे कि पुरुषाला हि गर्भाशय असते ?.  या प्रश्नाचे उत्तर आता कदाचित ‘हो’ असेच द्यावे लागेल. कारण पोटदुखीवर उपचार घेण्यासाठी गेलेल्या पुण्यातील सागर गायकवाड या तरुणाला प्रसिध्द दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने चक्क गर्भाशय असल्याचा धक्कादायक अहवाल दिला. हा अहवाल पाहून चक्रावलेल्या सागर गायकवाड यांनी थेट फॅमिली डॉक्टरकडे धाव घेतल्यानंतर हा अहवाल चुकीचा असल्याचे उघड झाले. या घडलेल्या प्रकारामुळे दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचा अजब कारभार समोर आला आहे.पोटदुखीने त्रस्त असलेल्या सागर गायकवाड यांनी सात मे रोजी फॅमिली डॉक्टरकडे धाव घेतली. मात्र पोटदुखीचा त्रास जास्त असल्याने डॉक्टरांनी त्यांना दीनानाथ हॉस्पिटलात जाऊन सोनोग्राफी करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर गायकवाड यांनी दीनानाथ हॉस्पिटलात जाऊन सोनोग्राफी केली असता त्यांना चक्क गर्भाशय असल्याचा अहवाल रुग्णालय प्रशासनाने हातात दिला. या प्रकाराने चक्रावलेले गायकवाड यांनी दुस-या डॉक्टरांचा सल्ला घेणे पसंत केले. दुस-यांदा केलेल्या तपासणीत मात्र दीनानाथ रुग्णालयाने दिलेला अहवाल चुकीचा असल्याचे निष्पन्न झाले.

या लिंक वर क्लिक करून फेसबुक पेजला लाईक करूनही बातम्या मिळवू शकता 

या सर्व प्रकारामुळे गायकवाड याना मोठा मनस्ताप सहन करावा लागला असून या प्रकारामुळे गायकवाड यांनी तब्बल दोन महिने तणावाखाली घालवले. झाला प्रकार त्यांनी मित्रमंडळींच्या कानावर घातला असता त्यांनाही हा सर्व प्रकार हास्यास्पद वाटला. हा अहवाल चुकीचा असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर मात्र गायकवाड यांचा जीव भांड्यात पडला.
याबाबत रुग्णालयाचे संपर्क अधिकारी येडकीकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याविषयी चौकशी करून माहिती देणार असल्याचे सांगितले. हा प्रकार हास्यास्पद वाटत असला तरी तो तितकाच गंभीर आहे. या सर्व प्रकारामुळे रुग्णालय कर्मचा-यांच्या छोट्या चुकीमुळे एखाद्याच्या आयुष्यात वादळ निर्माण निर्माण होऊ शकते. ही एक गंभीर घटना असून अशी चूक एखाद्याच्या जिवावरही बेतू शकते, त्यामुळे अशा घटना टाळण्यासाठी रुग्णालयांनी काळजीपूर्वक काम करणे आवश्यक आहे.

आमच्या अधिक बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वर क्लिक् करा 

 

Share Now
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular