बिफ वाहतुकीच्या संशयावरून ट्रक जाळले

 

वृत्तसंस्था,बेरहामपूर  

ट्रक मध्ये बिफ वाहून नेत असल्याचे आरोप करत गोलंथराजवळील राष्ट्रीय महामार्गावर जमावाने रविवारी रात्री एक ट्रकला आग लावून दिले.ट्रकचे चालक व क्लिनर  मात्र आपला जीव वाचवून पळून गेले . बिहारहून मुंबईला निघालेला हा ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने उलटला .त्यातून काही पाकिटे बाहेर पडली .त्या पाकिटात बिफ असल्याचे आरोप करत स्थानिक नागरिकांनी ट्रक पेटवून दिले .व ट्रकचे चालक व क्लिनरला अटक करण्याची मागणी करत राष्ट्रीय महामार्ग रोखून धरले .त्यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते.वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटना स्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली .ट्रक मधील काही पाकिटे जप्त करून तपासणीसाठी पाठवण्यात आल्याचे बेरहामपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी अशोककुमार मोहित यांनी सांगितले   .

sajag-advertisement-offersajag addgolden night sex power supliment
Advertisement

Leave a Reply