बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयात शौचालयाचा घोटाळा..
पुणे _ बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयातील प्रभाग क्र 37 मधील स्वछ भारत अभियान अंतर्गत बांधलेल्या शौचालयात मोठ्या प्रमाणावर घोटाळा झाल्या असल्याचे माहिती अधिकारात ग्राहक हक्क संघर्ष समिती चे अध्यक्ष मिलिंद राजहंस यांनी उघडकीस आणलेले आहे स्वछ भारत अभियान अंतर्गत साधारणता 2500/3000 हजार शौचालय बांधण्यात आली आहे त्यात 80% शौचालय हे बोगस बांधण्यात आल्याचे आरोप राजहंस यांनी केलेआहे. ठेकेदारांनी नविन शक्कल लढवत काहि जुन्या ठिकाणी चे फोटो काडून जोडले आहे तसेच काहिचे शौचालय अर्धवट बांधण्यात आली आहे तर काहिना फक्त शौचालयाचे भांडे व दार बसवून नागरिकांची तर दिशाभुल केलीच आहे तर एका शौचालया मागे 18000 हजार घेऊन शासनाची देखील फसवणूक केली आहे विषेश म्हणजे अधिकारयानी बिले देण्या अगोदर शहानिशा करणे गरजेचे असताना ती शहानिशा न करताच बिले दिली गेल्याचे दिसुन येत आहे यात वर पासुन ते खाल पर्यंत साटेलोटे असल्याची चर्चा बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयात ऐकण्यास मिळत आहे … याची दखल घेत ग्राहक हक्क संघर्ष समिती चे अध्यक्ष मिलिंद राजहंस यांनी पुणे महानगर पालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्या कडे सखोल चौकशी करण्याची व संबंधित अधिकारी यांची चौकशी करून निलंबित करणयाची मागणी केली आहे.
बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयात शौचालयाचा घोटाळा..
RELATED ARTICLES