ताज्या घडामोडी

विध्यार्थी करतात असा दररोज जीव घेणा प्रवास ?

Advertisement

 विध्यार्थीनच्या जागी पालकांनी रिक्शातून असा जीव घेणा प्रवास एक दिवस  करून पहावे कसे वाटते ?

पुणे : प्रतिनिधी : आपण आपल्या  मुलांची घरी खूप काळजी घेतो पण शाळेत सोडताना निष्काळजीपणा करतो कि ज्या बस ,कार,रिक्षात, मुले शाळेत जात आहे त्यात तो निवान्त पणे बसू शकतो का ? त्याचा जीव गाडीत गुदमरत तर नाहीना ? रिक्षाचालक,कारचालक जनावरानप्रमाणे तर मुले गाडीत भरत नाहीना याची काळजी घेतो का ? कि स्कूल ब्याग प्रमाणे  ओझ्या सारखे मुलांना कोठेहि  फेकून देतो?   मुलांची काळजी घेणे हि पालकांची जबाबदारी नाही का ?अशे अनेक प्रश्न यातून उपस्थित होत आहेत . पुणे परिवहन विभागाकडून स्कूलबस चालविण्यासाठी कठोर नियम असतानाही शहरात अनेक स्कूलबस बिनदिक्कतपणे नियम तोडून  विद्यार्थ्यांना ने-आण करीत आहेत.

या लिंक वर क्लिक करून फेसबुक पेजला लाईक करूनही बातम्या मिळवू शकता

Advertisement

नियमांना धाब्यावर बसवून राजरोसपणे चालविण्यात येणाऱ्या या स्कूलबसवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी लोकहीत फाउंडेशनकडून करण्यात आली आहे.आरटीओ नियमानुसार रिक्षामध्ये तीन आणि मारुती व्हॅनमध्ये सातपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची वाहतूक करता येत नाही. मात्र सध्या रिक्षात ८ ते १२ विध्यार्थी ,तर कार मध्ये  १० ते १६ विध्यार्थी  कोंबून या दोन्ही वाहनांतून क्षमतेपेक्षा जास्त मुलांची वाहतूक केली जात आहे. एकाच वाहनात जास्त प्रमाणात मुले भरल्यामुळे त्यांना संसर्गजन्य आजार होण्याची शक्यता असते. तसेच मुलांची दप्तरे बाहेर लटकवण्यात येत असल्याने वाहतुकीला देखील अडथळा होत असून अनेक वेळा वाहन चालकानमध्ये किरकोळ भांडणे हि होतात, अशी माहिती फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अजहर खान यांनी दिली.याबाबत प्रादेशिक परिवहन कार्यालयाला निवेदन देण्यात आले आहे. स्कूलबसच्या अवैध वाहतुकीकडे आरटीओ आणि वाहतूक पोलीस दुर्लक्ष करीत आहेत. वाहतूक सुरळीत करण्याच्या नावाखाली पावती फाडून टार्गेट पूर्ण करणाऱ्या वाहतूक पोलिसांना हे सर्व प्रकार कसे काय दिसत नाही? असा प्रश्न फाउंडेशनने उपस्थित केला आहे.दरम्यान, याबाबत दोषी स्कूलबस चालकांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे आश्वासन आरटीओचे  बाबासाहेब आजरी यांनी दिले असल्याचे खान यांनी सांगितले. 

आमच्या अधिक बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वर क्लिक् करा

 

Share Now

Leave a Reply