Homeताज्या घडामोडीसहाय्यक पोलीस हवालदाराला केले स्वताच्या घरापासून वंचित

सहाय्यक पोलीस हवालदाराला केले स्वताच्या घरापासून वंचित

सनाटा प्रतिनिधी :आपल्या भारत देशात सामान्य नागरीकावर  जेव्हा कोणी अत्याचार करतो किवा त्यांना फसवितो   तेव्हा आपण क्षणाचा हि विचार न करता पोलिसान जवळ  न्याय मागण्यासाठी जातो कारण आपल्याला माहित असते कि पोलीस काका आपल्याला न्याय  मिळवून  देण्यासाठी सहकार्य करतील .पण या प्रकरणात उलटच झालेले आहे कि  पोलीस काकाच न्यायासाठी वणवण भटकत आहे .व स्वताच्या घरापासून वंचित झाले आहे .
याबाबत सविस्तर वृत्त असे की सांगली  जिल्ह्यातील तासगांव तालुक्यातील चिंचणी या गावात संभाजी तुकाराम गायकवाड़ यांचे स्वमालकीचे राहते घर असून त्यांच्या घरासमोर चिंचणी ग्रामपंचायतीची स्वमालकीची मोकळी जागा आहे .संभाजी गायकवाड़ यांचे मोठे बंधु विष्णु तु गायकवाड़ यांनी दाण्डगाइने तुकाराम गायकवाड़ यांच्या राहत्या घराच्या बाहेरिल भिंतीत भोके पाडून त्यात एंगल रोऊन ग्रामपंचायतीच्या मोकळया जागेत 250 चौ फूट अनाधिकृत बांधकाम केले आहे .त्यामुळे संभाजी गायकवाड़ यांची खिड़की आणि जान्या-येन्याचा रस्ता बंद झाला आहे. त्यामुळे संभाजी यांच्यावर नाइलाजास्तव स्वतःचे घर व गाव सोडून  दुसरीकडे राहण्याची नामुश्कि ओढावली आहे .संभाजी तुकाराम गायकवाड़ हे महाराष्ट्र पोलिस दलात सहा पो हवालदार पदावर सांगली येथे सेवेत रुजू आहेत .यासंदर्भात मागील 2-3 वर्षापासून संभाजी गायकवाड़ यानी चिंचणी ग्रामपंचायत, तासगाव बी डी ओ आणि सांगली जिल्हा परिषद यांच्याकडे अनेकदा लेखी तक्रार केली .पण त्याची ना कोणी दखल घेतली ना कोणती कारवाई झाली शेवटी संभाजी गायकवाड़ यानी कुटुंबासह आत्मदहनाचा ईशारा दिला .पण काहीही उपयोग झाला नाही त्यामुळे  अखिल महाराष्ट्र माहिती अधिकार समिती महाराष्ट्र राज्य अध्यक्ष नितिन शशिकांत यादव यांनी सांगलीचे मा जिल्हाधिकारी सो यांच्याकडे लेखी तक्रार करुन भारतीय संविधानाने नागरिकांना दिलेल्या जगण्याच्या , स्वतःच्या मालकी हक्काच्या घरात राहन्याच्या व वावरण्याच्या मूलभूत हक्कापासुन वंचित ठेवणाऱ्या सदर तहशीलदार आणि बी डी ओ कार्यालयातील संबधित सर्व अधिकार्यांची चौकशी करुन दोषीनवर कायदेशीर कारवाई करुन संभाजी गायकवाड़ यांना न्याय देण्यासाठी लेखी तक्रार केली होती. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत मा जिल्हाधिकारी सो यानी तासगांव तहशीलदार यांना चौकशीचे आदेश दिले आहेत.
   

 

Share Now
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular