सजग नागरिक टाइम्स:पुणे :शिवाजीनगर भागातील वडारवाडी परिसरात एका व्यक्तीला सावकारी व्याजाच्या जाचाने आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले असल्याची तक्रार चतुर श्रुंगी पोलीस स्टेशन मध्ये दाखल झाली आहे.डिसेंबर २०१३ पासून ते २० नोव्हेंबर २०१७ पर्यंत फिर्यादी यांचे वडील नामे विजय प्रल्हाद आगलावे वय ५६ वर्षे रा.३३६ जुनी वडारवाडी चौक पुणे यांनी कैलास मंजालकर मंजालकर चौक वडारवाडी पुणे,२)दिलीप जाधव रा. वडारवाडी, ३).बड्या रा. वडारवाडी. ४)पंकज उणेचा. वडारवाडी.५).अनमोल उणेचा रा. वडारवाडी यांनी व्याजाने पैसे दिले होते विजय प्रल्हाद आगलावे यांच्याकडून तारीख वेळी व ठिकाणी यातील नमूद इसम यांनी बेकायदेशीर ,विना परवान्याने व्याजाचा धंदा चालू करून फिर्यादी यांच्या वडिलांना दिले होते.
फिर्यादी यांच्या वडिलांनी व्याज दिले असताना देखील पैश्यासाठी तगादा लावून मानसिक त्रास देऊन दमदाटी करून घर रिकामे करण्यास सांगत होता.या जाचाला कंटाळून विजय आगलावे यांनी राहते घरात छताच्या लाकडी वाश्यास साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची तक्रार चतुरश्रुंगी पोलीस स्टेशन मध्ये दाखल करण्यात आली आहे.सदरील प्रकरणी पोलिसांनी ५ आरोपींवर महाराष्ट्र मानिलेंडीग अॅकट २०१४ चे कलम ४ सह ४४,२३सह ४२,४५ . ५५३/१७ भा.द.वी.कलम ३०६.३४ प्रमाणे कलम लावण्यात आले असून कोणीही अटक झाले नसल्याची माहिती मिळाली.
सावकारी व्याजाने घेतला एकाचा बळी
RELATED ARTICLES