पुणेकरांना उद्यापासून मिळणार मोफत वायफाय

 स्मार्ट सिटी अतर्गत १५० ठिकाणी  मिळणार सुविधा
 

Deal of the Day:10,999.00

पुणे : स्मार्ट सिटीच्या माध्यमातून पुणेकरांना उद्या(२६ जानेवारी)पासून पुणे शहरात १५० ठिकाणी वायफाय सुविधा ही मोफत मिळणार आहे.आज पत्रकार परिषदेत महापौर मुक्ता टिळक यांनी ही माहिती दिली.स्मार्ट सिटीचे संचालक राजेंद्र जगताप ,पुणे महापालिका आयुक्त कुणाल कुमार ,उपमहापौर सिद्धार्थ धेंडे या वेळी उपस्थित होते. ही सुविधा शहराच्या वर्दळीच्या ठिकाणी देण्यात येणार आहे.त्यात उद्याने ,महापालिकेच्या इमारती,महाविद्यालये,पोलीस ठाणे ,प्रमुख रस्ते,यांचा समावेश आहे .पहिल्या टप्यात प्रत्येक व्यक्तीस ५० एमबी इंटरनेट ५१२ केबीपीएसच्या स्पीडने मोफत मिळणार आहे .एल अॅड टी,रेलटेल व गुगल यांच्या माध्यमातून ही सुविधा मिळणार आहे .पुणे महापालिका व स्मार्ट सिटीच्या माध्यमातून ही सुविधा दिली जाणार आहे .

 

Leave a Reply