सजग नागरिक टाइम्स: 5 ऑक्टोबर२०१७ रोजी दुपारी १२.30 च्या दरम्यान एका महिलेला एका महिलेने फोन करून नोकरीवर लावण्याच्या बहाण्याने 100 रु नेटबॅकिंग द्वारे भरण्यास सांगून दोन लाख ट्रानजीकशन द्वारे काढण्यात आले .या संदर्भात हकीकत अशीकि फिर्यादी महिला दीप्ती सुरेन्द्रन (वय २७ रा.एन सी एल कॉलनी पाषाण रोड पुणे.)हे नोकरीच्या शोधात असून हे त्यांच्या आत्याच्या घरी एन सी एल कॉलनी पाषाण रोड येथे असताना फिर्यादीच्या मो.नंबरवर एका महिलेने फोन करून नोकरीवर लावण्याच्या बहाण्याने 100 रु नेटबॅकिंग द्वारे www.applynokri.co.in या वेबसाईटवर भरण्यास सांगितले.परंतु फिर्यादीने त्यांच्या मामा सरदारीलाल यांच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अकाऊन्टवरून नेटबॅकिंग द्वारे 100 रु भरले असता त्या जागी एक लाख रुपये खात्यामधून ट्रानजीकशन झाले. या संदर्भात परत फोन करून सांगितले असता त्यांनी otp नंबर मागून पुन्हा एक लाख काढून घेतले .असे दोन लाख रुपयाची फसवणूक झालेली असल्याचे लक्षात आल्याने फिर्यादीने चतुर्श्रींगी पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली होती .या संदर्भात आरोपी हिमांशू रवी अरोरा वय २४ वर्ष रा.टिळक विहार टिळक नगर नवी दिल्ली यास कोर्टाच्या प्रोडूस वारंटने औरंगाबाद मध्यवर्ती कारागृहातून ताब्तात घेऊन त्यास कोर्टात हजर केले असता प्रथम न्यायदंडाधिकारी यांनी २७ जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून आरोपी तर्फे अॅड.साजिद बी शहा , अॅड.अंबादास बनसोडे यांनी काम पहिले .
नोकरी देण्याच्या बहाण्याने दोन लाखाची फसवणूक करणा-यास अटक
RELATED ARTICLES