वेडा बॉयफ्रेंडवर बंदी घालण्याची मागणी

WEB HOSTING OFFERsajag-advertisement-offer
Advertisement
Deal of the Day:10,999.00
2,999.00 EMI starts at 165 per month

सजग नागरिक टाइम्स: वेडा बॉयफ्रेंड या मराठी चित्रपटामध्ये एका भागात  मुस्लीम कलाकाराने हात जोडून नमन केलेले दाखवण्यात आले आहे .व दुसऱ्याएका भागात हिरोने कबड्डी जिकल्यानंतर मुस्लीम हिरोईन बुरख्याचा नकाब काढून हातामध्ये घेऊन नाचत असताना दृश्य दाखविलेले आहे.व एका आयटम सॉंगमध्ये महिलेला आयटम म्हणून संबोधले आहे. या सर्व प्रकरनामुळे मुस्लीम समाजाची मने दुखावली गेली असून मुस्लीम समाजात हात जोडून नमन करण्यास मनाई असून या चित्रपटावर बंदी घालावी अथवा डायरेक्टरने जाहीर माफी मागावी म्हणून जनता संघर्ष दल तर्फे पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करून निवेदन देण्यात आले .या आंदोलनात जनता संघर्ष दलचे संस्थापक अध्यक्ष फिरोज मुल्ला,आरिफ खान ,भीम साम्राज्याचे महिला प्रमुख आफरीन खान ,मोईन खान ,मुस्ताक पटेल,साजिद शेख,अय्युब शेख,महेश कांबळे,चांदभाई बलबट्टी,आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

कमी गुंतवणुकीत आजच आपले News Portal बनवा व पैसे कमवा

न्यूज वेबसाईट एका दिवसात बनवून मिळेल