सनाटा प्रतिनिधी ;पुणे शहरातील नामांकित असलेले हाय प्रोफाईल भाग म्हणजे कोरेगाव पार्क या भागात येणारे नागरिक जास्तित्त करून मौज मजा करण्यासाठीच येत असतात . कोरेगाव पार्क या परिसरात विविध ठिकाणी पप हुक्का पार्लर, वेश्याव्यवसायव चालत असून गुन्हे पोलीस व सामाजिक सुरक्षा विभागा मार्फत अनेक वेळा कारवाई करून येथील अवैध धंदे बंद करण्यात आले आहेत .तरी पण अवैध धंदे वाले काही सुधरत नसून दरवेळी नवीन शक्कल लढवून धंदे करत आहे .असेच एक प्रकार सामाजिक सुरक्षा विभागाकडून उघडकीस आणून एका मुलीची यातून सुटका करण्यात आली असून दोन जणांना अटक करण्यात आली आहे.
फक्त ६१९ रुपयात गोल्ड प्लेटेड नेकलेस अधिक माहितीसाठी यालींकवर क्लिक करा
अटक केलेले आरोपी आहे अनुजा प्रशांत देशमुख उर्फ स्नेहा दिदि उर्फ सारिका गुंड वय ३२ वर्षे रा.डहाणूकर कॉलनी कोथरूड . गेस्ट हाउसचे केयर टेकर २ ) रणजीत नारायणसिंग रावल वय ४८ वर्षे रा .कोणार्क पार्क ढोले पाटोल रोड पुणे ,हे दोघे मिळून एका नामांकित कम्पनीच्या गेस्ट हाउस मध्ये परराज्यातून मुली आणून त्यांना वेश्याव्यवसाय करण्यास लावत होते . पो.ना .नितीन तेलंगे यांना एका बातमीदारामार्फ्त माहिती मिळाली कि कोणार्क पार्क ढोले पाटोल रोड पुणे यात वेश्याव्यवसाय चालू आहे .
आमच्या अधिक बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वर क्लिक् करा
अशी माहिती मिळताच अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष गुन्हे शाखा पुणे शहर या विभागातील अधिकारी व कर्मचारी तसेच कोरेगाव पार्कमधील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी मिळून संयुक्त कारवाई करून एका सज्ञान मुलीची सुटका करून दोन्ही आरोपींना अटक केले आहे .या लिंक वर क्लिक करून फेसबुक पेजला लाईक करूनही बातम्या मिळवू शकता
सदरील कारवाई हि प्रदीप देशपांडे अप्पर पोलीस आयुक्त ,गुन्हे शाखा .पंकज डहाणे ,पोलीस उप आयुक्त गुन्हे .संजय निकम ,सहाय्यक पोलीस आयुक्त ,गुन्हे २ .यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय पाटील , सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव , सहाय्यक पोलीस निरीक्षकशीतल भालेकर ,संजय गिरमे ,ननिता येळे ,कविता नलावडे ,राजेश उंबरे ,राजेंद्र कचरे,प्रदीप शेलार ,सचिन कदम ,सचिन शिंदे ,नितीन तेलंगे ,सरस्वती कागणे यांनी कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मदतीने कारवाई केली .