Homeताज्या घडामोडीआयोध्येत राममंदिर व्हावे :शिया बोर्ड

आयोध्येत राममंदिर व्हावे :शिया बोर्ड

आयोध्येतील बाबरी मस्जिद- रामजन्मभूमी वादाच्या अनुषंगाने शिया वक्फ बोर्डाने सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. या जमिनीवरील एक तृतीयांश भागावर आपले हक्क सांगितले आहे .बाबरी मस्जिद हि मीर बाकीने बांधली होती आणि मीर बाकी हे शिया पंथी असल्याने या विवादित जमिनीतील एक तृतीयांश भाग शिया वक्फ बोर्डाला द्यावे .असे शिया वक्फ बोर्डाने प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे. आयोध्येतील वादग्रस्त जागेवर राम मंदिर व्हावे आणि तेथून थोड्याच अंतरावर मुस्लीम बहुल भागात मस्जीदीसाठी जागा द्यावी असे शिया वक्फ बोर्डाने म्हंटले आहे.मस्जीदीसाठी पुरेशी जागा दिल्यास वादग्रस्त जागेवरील दावा सोडण्यास आम्ही तयार आहोत. वादग्रस्त जागेत मंदिर आणि मस्जिद बांधल्यास रोज वाद होण्याची शक्यताही वर्तवली आहे , असे मतही शिया वक्फ बोर्डाचे मत आहे .सुन्नी वक्फ बोर्डाला या वादावर शांततेच्या मार्गाने तोडगा नकोय असे आरोपही शिया वक्फ बोर्डाने सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्रात केले आहे. या प्रकरणात सर्व पक्षकार एकत्रित बसून तोडगा काढू शकतात,त्यासाठी सुप्रीम कोर्टाने वेळ द्यावे, सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाच्या दोन निवृत्त न्यायाधीशांच्या नेतृत्वाखाली एक उच्चस्तरीय समिती नेमावे .पंतप्रधान कार्यालय व मुख्यमंत्री कार्यालयाचे अधिकारी व सर्व पक्षकार या समिती मध्ये असावे ,अशी विनंती हि शिया वक्फ बोर्डाने केली आहे .

Share Now
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular