ताज्या घडामोडी

दोन अनोळखी महिलांनी सोनाराला ७१.११७ रुपयाचा लावला चुना .

Advertisement

पुणे :पुणे शहरातील रास्ता पेठ अपोलो थेटर जवळील परमार ज्वेलर्स मधील ७१.११७ रुपये किमतीचे मंगळसूत्र दोन अनोळखी महिलांनी चोरून नेले असून आनंद परमार ,वय ३३ ,रा.रास्ता पेठ पुणे .यांनी समर्थ पोलीस स्टेशन मध्ये तक्रार नोंदवली आहे .सदरील प्रकार परमार ज्वेलर्स मध्ये ५ ऑगस्ट रोजी दुपारी १२.२० वाजता घडला .फिर्यादी आनंद परमार हे त्यांच्या दुकानात बसले असताना दोन अनोळखी महिला हे मंगलसूत्र खरेदी करण्याच्या बहाण्याने दुकानात आले .त्यांनी दुकानातील कामगारांना त्यांचे खोटे नाव सांगून व बोलण्यात गुंतवून विश्वास संपादन केले.व दुकानातील गर्दीचा फायदा घेऊन फिर्यादी व कामगारांची नजर चुकवून दुकानातील ७१.११७ रुपये किमतीचे एक सोन्याचे मंगळसूत्र चोरी करून नेले असून फिर्यादी यांनी सदरील प्रकार समर्थ पोलीस स्टेशन मध्ये कळवला असून समर्थ पोलीस स्टेशनचे पोलीस उप निरीक्षक शिरसाठ यांनी दोन अज्ञात महिलान विरोधात गुन्हा नोंदवला असून पुढील तपास चालू असल्याची माहिती मिळाली .

Share Now

Leave a Reply