ब्रेकिंग न्यूज

सराईत गुन्हेगारास केले तडीपार

Advertisement

पुणे :बंडगार्डन पोलीस स्टेशन च्या हद्दीतील सराईत गुन्हेगारास परिमंडळ २ चे पोलीस उप आयुक्त डॉ .प्रवीण मुंडे यांनी ४ ऑगस्ट रोजी तडीपार केले आहे .सराईत गुन्हेगाराचे नाव आहे अक्षय उर्फ मुंज्याबा राजेंद्र वाघमारे .वय ,२१ वर्ष रा .दुष्काळ ग्रस्त झोपडपट्टी ,१३ ताडीवाला रोड ,पुणे . या अक्षयवर बंडगार्डन पोलीस स्टेशन च्या हद्दीत अनेक गंभीर प्रकारचे गुन्हे दाखल आहेत .मारहाण करणे , अतिक्रमण करणे ,दंगा करणे ,धार्मिक स्थळाचे नुकसान करणे अथवा अपवित्र करणे ,घातक शस्त्र बाळगणे ,जबरी चोरी करणे ,परीसरात दहशत माजवणे असे अनेक गुन्हे या अक्षयवर असल्याने पोलीस उपआयुक्त डॉ.प्रवीण मुंडे यांनी या सराईत गुन्हेगारास पुणे शहरातून एक वर्षासाठी तडीपार केले आहे. सदरील गुन्हेगार पुणे शहरात दिसून आल्यास नागरिकांनी बंडगार्डन पोलीस स्टेशनला कळवावे असे आव्हान परिमंडळ २ कडून नागरिकांना करण्यात आले आहे .

Share Now

Leave a Reply