सजग नागरिक टाइम्स:ट्रकची दुचाकीला धडक बसून दुचाकीस्वार युवक जखमी झाल्याची घटना वाघोली लोहगाव चाैकात घडली आहे. जुनेद समिर शेख असे अपघातात जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे.अपघातानंतर ट्रकचा चालक फरार झाला असून याप्रकरणी लोणीकंद पोलिस ठाण्यात अपघाताची तक्रार देण्यात आली आहे. जुनेद शेख हा पुणे शहर पोलिस दलाचे एसीपी समीर शेख यांचा मुलगा असून शेख कुंटुंबीय हे वाघोली या ठिकाणी वास्तव्यास आहे.जुनेद शेख हा पुणे शहर पोलिस दलाचे एसीपी समीर शेख यांचा मुलगा असून शेख कुंटुंब वाघोली या ठिकाणी वास्तव्यास आहे.. एमएच.१२. एन एक्स ७५७८ या ट्रकने दुचाकीला धडक दिल्यानंतर जखमी झालेल्या जुनेदला वाघोली ग्रामस्थांनी तात्काळ लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये दाखल केले. जुनेदची प्रकृती स्थिर असून उपचारासाठी पुणे शहरामध्ये पाठविण्यात आले असल्याची माहीती डॉक्टरांनी दिली.