ब्रेकिंग न्यूज

पुणे शहरात गांजा, जुगार, मटका अशा अवैध धंद्यांचा सुळसुळाट .

Advertisement

 
खालील व्हिडियो पाहण्यासाठी क्लिक करा

सजग नागरिक टाइम्स:पुणे शहरात मा. पोलीस आयुक्त यांनी पदाची सूत्र हाती घेताच अवैध धंद्यांवर विशेषतः दारू, गांजा, मटका, जुगार यांच्या क्लब,विरोधात केलेली कारवाई आणि घेतलेली भूमिका खरोखरच जनसामान्य नागरिकांना मा. पोलीस आयुक्तांचा अभिमान वाटावी अशी होती. पण आता शहरात राजरोसपणे चालू असलेले जुगाराचे क्लब, मटका, गांजा, सोरट असे अवैध धंदे पाहता त्यावेळी आयुक्तांनी घेतलेल्या भूमिकेवर शंका येते की, तेव्हाची भूमिका खरंच अवैध धंद्यांच्या विरोधात होती का ? आता पुणे शहरात मोठ्या प्रमाणात राजरोसपणे अगदी पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर मटका, सोरट आदींसारखे अवैध धंदे चालू आहेत. याबाबत सामाजिक कार्यकर्ते विकास कुचेकर हे सत्यता जाणून घेण्याचा प्रयत्न केल्यावर त्यांना  समोर आलेले वास्तव असे आहे की, पोलीस परिमंडळ २ यांच्या कार्यक्षेत्रात स्वारगेट पोलीस स्टेशन , मार्केटयार्ड पोलीस स्टेशन, बिबवेवाडी पोलीस स्टेशन यांच्या हद्दीत गर्दीची ठिकाणे, व्यापारी संकुलने आणि त्याचप्रमाणे झोपडपट्टी वसाहत मोठ्या प्रमाणात आहे. वरील पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात राजरोसपणे दारूधंदे , मटका, जुगार व क्लब आदी अवैध धंदे पोलिस स्टेशन व शाळा यांच्या शंभर मिटरच्या अंतरावर बेकायदेशीरपणे खुलेआम सुरु आहेत.
अमाझोन ऑफरची माहितीसाठी लिंकवर क्लिक करा
मार्केटयार्डमध्ये पुणे शहरातूनच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातून शेतीमाल विक्रीसाठी शेतकरी येत असतात आणि हेच शेतकरी आपला शेतीमाल विकून झाल्यावर अशा अवैध व्यवसायातील प्रलोभनांच्या चक्रव्यूहात अडकले जात आहेत. समाजास अत्यंत हानिकारक ठरणाऱ्या मटका, जुगार, गुटखा, गांजा, दारू इत्यादींमुळे अनेकांचे संसार देशोधडीस लागत आहेत. याठिकाणी केवळ झोपडपट्टीतील अल्प उत्पन्नातील लोक व हातावर पोट अवलंबून असणारे सर्वसामान्य नागरिकच नव्हे तर शासकीय, निमशासकीय कार्यालयातील नोकरदार मंडळी, अधिकारी, कर्मचारी, कित्येक लहान मोठे व्यावसायिक मटका, लॉटरी, सोरट, इत्यादींसारख्या अवैध व्यवसायांच्या प्रलोभनास बळी पडून ते या चक्रव्यूहात अडकलेले दिसत आहेत. या परिसरात गुंडांकडून वर्चस्व निर्माण दहशत निर्माण करण्याच्या प्रयत्नांमुळे येथील सामाजिक शांततेचा ऱ्हास होत असून कित्येक कुटुंबे असुरक्षित होऊन रस्त्यावर येत आहेत. मार्केटयार्ड पोलीस स्टेशनपासून अगदी हाकेच्या अंतरावर मटका जुगाराचा अड्डा चालू आहे. मार्केटयार्ड बस स्टॉप समोर, बिबवेवाडी पोलीस स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर, स्वारगेट येथील लक्ष्मी नारायण थेटर समोर, मार्केटयार्ड ट्र्क पार्किंगमध्ये, पंपासमोर, आंबेडकर नगर रिक्षा स्टॅन्ड शेजारी या व अशा विविध ठिकाणी दारू, मटका, ताडीविक्री, सोरट असे अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरु आहे. हे अवैध व्यवसाय चालक पोलीस रेकॉर्डमध्ये गुन्हेगार आहेत आणि या गुन्हेगारांचे व्यावसायिक पुनर्वसन पोलिसांनीच केलेले यातून दिसत आहे  ?  या व्यवसाय चालकांकडून पोलीस स्टेशन स्तरावर एक पोलीस कर्मचारी नेमून हप्ते वसुली केली जात असल्याचे  निदर्शनास येत आहे. मा. पोलीस आयुक्त यांनी पोलीस आयुक्त पदाची सूत्र हाती घेताच अवैध धंद्यांवर निर्माण केलेली दहशत यावरच शंका उपस्थित होत आहे.आयुक्त अवैध धंदे चालत असलेल्या क्षेत्रातील अधिकाऱ्यांवर कारवाई करतील का ?  यावर जर कारवाई झाली नाही तर याबाबत जनजागृती करून जनआंदोलन उभे करणार .अशी माहिती मानवी हक्क संरक्षण आणि जागृती संस्थेचे अध्यक्ष विकास कुचेकर, पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष आण्णा जोगदंड, उपाध्यक्ष डॉ अभिषेक हरीदास, डॉ.अजय दुधाने अध्यक्ष आनंद व्यसन मुक्ती संस्था , संपर्क प्रमुख साहिल कांबळे, संस्थेचे सक्रिय पदाधिकारी मला कौर जुनी यांनी दिली.
अमाझोन ऑफरची माहितीसाठी लिंकवर क्लिक करा
 
 
 
 

Share Now

Leave a Reply