कात्रज-कोंढवा रस्त्यावर भीषण अपघातात

sajag-advertisement-offerWEB HOSTING OFFER
Advertisement

A horrific accident on the Katraj-Kondhwa road 

सजग नागरिक टाइम्स: पुणे –accident:आज दुपारी दोन वाजता कात्रज कोंढवा रस्ता येथे बस टेम्पो व व्हॅनच्या झालेल्या भीषण अपघात यात सुदैवाने चालक बचावला .उतारावरुन जाणाऱ्या बसने टेम्पोला व पुढे असणाऱ्या व्हॅनला टेम्पोने धडक दिल्याने टेम्पो चालक त्या टेम्पोमध्येच अडकला होता. तेथील नागरिकांनी अग्निशमन दलाला याबाबत माहिती दिल्यानंतर कोंढवा बुद्रुक अग्निशमन केंद्रांचे जवान व क्विक रिस्पॉन्स टिमचे वाहन घटनास्थळी तातडीने दाखल झाले. 
A horrific accident on the Katraj-Kondhwa road sajag nagrikk times sanataजवानांनी प्रथम टेम्पो चालकाची परिस्थिती पाहून पुढील बचाव कार्यास सुरवात केली. जवानांनी त्या तीन चाकी टेम्पोमधील चालकाशी संभाषण चालू ठेवत त्याची लवकरच सुटका करीत असल्याचे सांगितले. दलाकडील कटर, स्प्रेडरचा वापर करुन शक्कल लढवत अवघ्या पंधरा वीस मिनिटात चालकास जखमी अवस्थेत बाहेर काढून रुग्णवाहिकेतून रुग्णालयात रवाना केले.
टेम्पो चालकाच्या कंबरे खालील भागाला गंभीर दुखापत झाल्याचे तसेच टेम्पो व व्हॅनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे नागरिकांनी सांगितले. बसच्या पुढील भागाच्या काचा फुटल्या असून बसमधे प्रवासी असल्याने सुदैवाने मोठा अपघात टळल्याची चर्चा प्रथम दर्शनी नागरिकांमधे होती. नेमका अपघात कसा झाला याचा तपास पोलिस करीत आहेत. 
टेम्पो चालकाला तत्परतेने बाहेर काढण्यामधे कोंढवा बुद्रुक अग्निशमन केंद्राचे तांडेल सुभाष जाधव व वाहन चालक सुखदेव गोगावले तसेच जवान विशाल यादव, संदिप पवार व क्विक रिस्पॉन्स टिमचे राहुल जाधव, ओंकार ताटे, अविऩाश लांडे यांनी सहभाग घेतला.
 

One thought on “कात्रज-कोंढवा रस्त्यावर भीषण अपघातात

Leave a Reply

कमी गुंतवणुकीत आजच आपले News Portal बनवा व पैसे कमवा

न्यूज वेबसाईट एका दिवसात बनवून मिळेल