सनाटा प्रतिनिधी : सन 2017 च्या झालेल्या निवडणुकीत किरण जठार यांनी कळस धानोरी प्रभाग क्रमांक १ मधून भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढविली असून किरण निलेश जठार ह्या निवडून हि आल्या .त्यांच्या विरोधात राजेन्द्र वायदंडे रा .धानोरी पुणे यानी किरण जठार यांच्या जातीच्या दाखल्या संदर्भात जातपडताळणी कार्यालयाकडे तक्रार करून दाद मागितली होती. त्याची शहानिशा केली असता किरण जठार यांनी आजोबांचा शाळा सोडल्याचा बनावट दाखला जोडला असल्याचे निदर्शनास आल्याने सदरील दाखला जातपडताळणी समितीने अवैध ठरवला होता .स्वताच्या फायदयासाठी व नागरिकांची दिशाभुल करून निवडणूक लढवली संदर्भात किरण निलेश जठार यांच्या वर फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी राजेन्द्र वायदंडे यांनी पुणे शहर पोलीसांनकडे केली होती . काल नायब तहसीलदार यांनी फिरयाद दिल्यांनतर त्याची दखल येरवडा पोलीसांनी घेऊन किरण निलेश जठार यांच्यावर काल गुन्हा नोंदवला आहे .त्यांना अजून पर्यंत अटक केली नसून सदरील तपास पो .उप निरिक्षक पी व्ही देशमुख करीत आहे..
नगरसेविका किरण जठार यांच्यावर फसवणूकीचा गुन्हा दाखल.
RELATED ARTICLES