नाटक : पाऊले चालती पंढरीची वाट ” पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल “

WEB HOSTING OFFERsajag-advertisement-offer
Advertisement

नाटक : पाऊले चालती पंढरीची वाट ” पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल ”

आपल्या भक्ती संप्रदाय मध्ये वारकरी संप्रदाय हा एक प्रमुख संप्रदाय आहे. ह्या संप्रदायाचे वारकरी यांचे आराध्य दैवत पंढरपूरचा विठोबा ,,, दरवर्षी न चुकता – वारकरी भक्त मंडळींची पाऊले पंढरीच्या वाटेकडे निघतात, ऊन-पाऊस-वारा ह्याची पर्वा न करता हे सारे भक्तगण पंढरपूच्या / विठोबाच्या दर्शनासाठी आसुसलेले असतात. ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम इत्यादी संतश्रेष्ठ ह्या वारकरी पंथामधील आहेत, पंढरपुरची वारी करणारा तो वारकरी, दरवर्षी नियमितपणे वारीला जाणारे वारकरी लाखांनी आहेत. “पंढरपुरचा वारकरी” त्याच्या उपासनेचा जो मार्ग तो “वारकरी पंथ”

या वारकरी लोकांची पंढरपुरला जाणारी वारी कशी असते, त्याच सुरेख प्रदर्शन “पाऊले चालती पंढरीची वाट” ह्या आगळ्या वेगळ्या वारी-नाटय मध्ये पहायला मिळते. “बोला पुंडलीक वरदे हरी विठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम,पंढरीनाथ महाराज की जय” ह्या जयघोषात वारी नाट्याची सुरवात होते.

सरस्वती थिएटर प्रकाशीत, जॉय कलामंच निर्मित जॉय नागेश भोसले यांनी “पाऊले चालती पंढरीची वाट” हे वारीवर आधारलेले प्रतिकात्मक नाटक सादर केले. लेखन युवराज पाटील यांचे असुन दिग्दर्शन डॉ. संदीप माने यांनी केल आहे. नाटकाची संकल्पना आणि नृत्य दिग्दर्शन सचिन गजमल यांचे आहे. कार्यकारी निर्माता वैभव दादासाहेब माने, नेपथ्य / प्रकाश योजना सुनील देवळणकर यांनी केल आहे. कलाकार सुरेश चव्हाण, सुलभा जाधव, मंगेश कासेकर, सायली काजरोळकार, मधु शिंदे, स्नेहा पराडकर, अर्चना जगताप, सचिन गजमल, ह्यांच्या प्रमुख भुमिका असुन त्यांनी त्यांची जबाबदारी उत्तमपणे साकारलेली आहे.

Advertisement

वारकरी मंडळीना आषाढी कार्तीकीची चाहुल लागते वेगवेगळ्या गावातील, भिन्न-भिन्न स्वभावाची माणसं एकत्र येतात आणि भक्तीच्या रसात ती न्हाऊन निघतात- ही पंढरीची वारी भक्ताला एक वेगळी ऊर्जा देते. चालण्याचा आनंद देते. विठ्ठलनामाच्या जयघोषात सारा थकवा दूर निघुन जातो. हा प्रवास वाटेवरच्या गावात मुक्काम करीत भक्तीभावाने पुढे सरकत असतो. अश्याच एक वारीची कथा “पाऊले चालती पंढरीची वाट” मध्ये मांडली आहे.

Advertisement

एका गावातील सदाभाऊ वारीला जाणार असतात. गोदाक्का ला सर्व तयारी करून ठेवायला सांगतात. त्यांची लहानशी मुलगी मुकता ही सुद्धा त्यांच्याबरोबर येण्याचा आग्रह करते आणि ती त्यांच्याबरोबर जायला निघते. गोदाक्काला जायचे नसते पण ती मुलीला वेशीपर्यंत पोचवायला जाते. अधुनमधुन तिचे विचार बदलतात. वारीच्या प्रवासात एक वाईट मन प्रवास करत असते. आणि ते मन गोदाकाला वारीला जाण्यापासून परावृत्त करीत असते, पण आजुबाजुला सकारात्मक वातावरण असल्याने त्या वाईट मनाचा प्रभाव पडत नाही, कधी कधी गोदाक्काचा विचार बदलतो. पण सदाभाऊ आणि मुक्ता यांचा वारी पूर्ण करायचीच हा निर्धार असतो. प्रत्येक गावागावातील मुक्कामामधील लहान मोठया घडामोडी. वारीमधील वारकरी मंडळींची भजने, एकमेकांना मदत करण्याचा स्वभाव हे सारे परिणाम साधुन जाते, वारी पुढे पुढे जात असताना ह्यामध्ये चोरी करण्याचा प्रयत्न एक चोर करीत असतो पण त्याचे विचार कसे बदलतात हे पाहण्या सारखे आहे वारीमध्ये फिरणाऱ्या वाईट मनाला वारी मधून पळ काढावा लागतो. वारीमध्ये (देवात्मा) विठ्ठल आणि (देवात्मा) रूक्मिणी चे मानवाच्या रुपातील माणुसकीचे दर्शन सुरेख दाखवले आहे. प्रत्येक प्रवेश परिणाम साधण्याचा प्रयत्न करतो. वारीच्या प्रवासात विणेकरी-शांतक्का किर्तनकार हे सारे प्रवेश नाटयपूर्णतेने सादर करण्याचा प्रयत्न केला आहे. ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव, सावता माळी, गोरा कुंभार, एकनाथ, जनाबाई, मुक्ताई हे आणि थोर संतवैभव महाराष्ट्राला लाभलं, यांमधून संपन्न झालेलं वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान त्याचप्रमाणे विठुरायांच्या चरणी वाहुन घेतलेलं आयुष्य तितक्याच भावपुर्ण रितीने सर्वच कलाकारांनी सादर केल आहे. हे सादर करताना संतांच्या विविध रचना,अभंग,ओव्या,भारुड, भूपाळीची संगीतमय सुरांची सुरेख जोड लाभली आहे.त्याचे संगीत सचिन गजमल यांनी दिले आहे. त्यामुळे नाटयपूर्ण प्रसंगाला उठाव आला आहे.

या वारीनाट्याची खास गोष्ट म्हणजे भक्ती आणि सुरांच्या साथीने रंगमंचावर विठ्ठलाची मूर्ती घडवुन साकार केली आहे. त्यांनी नाटकाचा वेगळेपणा सिद्ध झाला आहे. डॉ. संदीप माने यांनी वेगळ्या पद्धतीने हा वारीचा थाट / पारंपारिक पद्धतीने साकारला आहे.पंढरीची वरी कोणत्या ना कोणत्या रूपात भक्ताला तृप्त करून जाते. पण काहींच्या नशिबी वारीचा योग प्रत्येकवेळी येतोच असे नाही. काही कारणामुळे इत्य्क्या लांबचा प्रवास करणं जमतच असे नाही. अश्या वेळी हा विठूनामाचा महिमा एका वेगळ्या रूपात भक्तांच्या पर्यंत पोहोचतो. तो म्हणजे “ पाऊले चालती पंढरीची वाट “ – वारीची परंपरा जपणारं एक प्रतीकात्मक वारी-नाट्य प्रामाणिकपणे टीमवर्क ने सादर केलं आहे.

दीनानाथ घारपुरे [ मनोरंजन प्रतिनिधि

Advertisement

 

Leave a Reply