पुणे पोलीसांनी ऑपरेशन मुस्कानद्वारे 27 अल्पवयीन मुले, मुली दिले पालकांच्या ताब्यात

सनाटा प्रतिनिधी ;   पुणे शहर पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्रातुन व परराजयातुन हरविलेले तसेच अपहरण झालेले बालकांचा ऑपरेशन मुस्कानद्वारे 1जुलै 2017 ते 30 जुलै 2017 दरम्यान शोध घेण्यात आला. या कारवाईत अंतर्गत समाजिक सुरक्षा विभाग, गुन्हे शाखेकडून 5 अल्पवयीन मुले, 5 अल्पवयीन मुली, व एका पोलीस स्टेशन मधुन 1 मुलगा, व 16 मुली असे मिळून एकुण 27  मुले, मुली यांना बाल कल्याण समिती पुणे यांच्या आदेशानवये पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे, एकंदरीत ऑपरेशन मुस्कान अंतर्गत हरविलेल्या बालकांचा शोध घेण्या सोबतच सापडलेल्या बालकांची ओळख निष्पन्न करून त्यांचे पालकांचे शोध घेऊन बालक व त्यांचे नातेवाईक यांचे भावनिक पुरनमिलन घडवून आणण्याची कामगिरी करण्यात  यश आले आहे .सदरील कारवाई चे आदेश प्रदिप देशपांडे अप्पर पोलीस आयुक्त  गुन्हे, पंकज डहाणे पोलीस उप आयुकत, संजय निकम सहायक पोलीस आयुकत, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक  संजय पाटिल , मसपोनि, शितल भालेकर, नामदेव शेलार, कविता नलावडे, रूपाली चांदगुडे, गितांजली जाधव, सरस्वती कागणे, सचिन शिंदे, यांनी केली आहे.,

 

Leave a Reply