पेट्रोल पंपात मापात पाप

पुणे : पुणे शहरातील सिह्गड रोड वरील पेट्रोल पंपात मापात पाप सुरु असल्याने .तेथील नियमित ग्राहकांना सतत त्याचा फटका बसत असेल .म्हणून एका वैतागलेल्या ग्राहकाने आज या पेट्रोल पंपाला धडा शिकविण्याच्या उद्देशाने पूर्ण तयारीने आला होता असे दिसत आहे .या ग्राहकाने सदरील पेट्रोल पंपाचा भांडाफोड करणारे एक व्हिडिओ काढून वायरल केले आहे .हया पेट्रोल पंपाचा मालक एक राजकीय नेता असल्याची माहिती समोर येत आहे.या पेट्रोल पंपावर एका दुचाकी स्वाराने १२० रुपयाचे पेट्रोल टाकले होते .नियमानुसार १ लिटर ६००एम .एल पेट्रोल मिळायला हवेत .टाकीतील पूर्वीचे पेट्रोल वेगळे .पण या दुचाकीत निघाले फक्त ९०० एम.एल .म्हणजे जवळ पास ७०० एम एल पेट्रोल कमी निघाले.या ग्राहकाने सर्वांसमोर याचा भांडाफोड केला .या पेट्रोल पंपावर संबंधित अधिर्याचे वरदहस्त असल्यानेच काहीही कारवाई होत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे . पुणे पोलिसांनी या चोर पंपावर कारवाई करावी व याचे लायसन जप्त करण्याची मागणी जोर धरू लागली आहे .

Leave a Reply