प्रविण मुंडे यांनी सराईत गुन्हेगाराला केले तडीपार

सनाटा प्रतिनिधी ;
पुणे शहर परिमंडल 2 मधील गुन्हेगारी नेस्तनाबुत करण्यासाठी परिमंडल 2 चे पोलीस उपायुकत प्रविण मुंडे यांनी स्वारगेट हद्दीत रहाणाऱ्या प्रसाद प्रकाश जाधव वय 25 राहणार (औघोगिक वसाहत गुलटेकडी) या सराईताला दोन वर्षासाठी तडीपार केले आहे. सदर सराईतावर बेकायदेशीर जमाव जमविणे, दंगा करणे, प्राणघातक शस्त्र घेऊन दंगा करणे, दुखापत करणे, बंदी आदेशाचे भंग करणे, सार्वजनिक मालमतेचे नुकसान करणे, जख्मी करणे, व ईतर गंभीर गुन्हे खडक, सवारगेट, मार्केट यारड पोलीस स्टेशन मध्ये दाखल असून नागरिकांच्या सुरक्षते साठी जाधव याला महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951चे कलम 56 (1)(ब) प्रमाणे दोन वर्षा करीता तडीपार करणयात आले आहे .नागरिकांना तडीपार गुन्हेगार दिसुन आल्यास नजीकच्या पोलीस स्टेशनशी संपर्क साधण्याचे आव्हान पोलीसांनी केले आहे.

Leave a Reply