भीम आर्मीचे भीक मांगो आंदोलन “(Bhim Army’s begging movement)
(Bhim Army’s begging movement):पुणे :शेतकरी कर्जमाफीसाठी राज्य सरकारने सामाजिक न्याय विभागाचे तसेच आदिवासी विकासाचे प्रत्येक ५०० कोटी वर्ग करून घेतल्याच्या निषेधार्थ
संताप व्यक्त करीत भीम आर्मी संघटनेच्यावतीने राज्य सरकारच्या विरोधात घोषणा देत ” भीक मांगो आंदोलन ”
(Bhim Army’s begging movement)आंदोलन करीत तीव्र धिक्कार करण्यात आला
राज्य सरकारची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाखीची असून सरकारवर आर्थिक ताण निर्माण झाला आहे .
अशा स्थितीत दलित मागासवर्गीय तसेच आदिवासी समाजासाठीच्या विशेष घटक योजनेतील निधी सरकारला पुरला नाही
त्यामुळे राज्य सरकारला ” भीक मांगो आंदोलन ” (Bhim Army’s begging movement) च्या माध्यमातून
सर्व सामान्य जनतेकडून भीक मागून आम्ही आर्थिक मदत करत असल्याचे भीम आर्मी पुणे शहर जिल्हा प्रमुख दत्ता पोळ यांनी सांगितले .
वास्तविक सामाजिक न्याय विभाग किंवा आदिवासी विकासाचा निधी हा विशेष घटक योजनेअंतर्गत असून शिक्षण , आरोग्य , रोजगार , घरकुल ,स्वछता आदींसाठी नियोजित असतो .
अशा प्रकारचा निधी इतरत्र वर्ग करणे हि बाब अशा घटकांच्या प्रगतीस अडथळा निर्माण करणारी आहे .
शेतकरी कर्ज माफीला आमचा विरोध नसून त्यांना कर्जमाफी मिळालीच पाहिजे परंतु , त्यासाठी मेट्रो ,
बुलेट ट्रेन तसेच सरकारी जाहिरातीसाठी करत असलेल्या खर्चाला मर्यादा घालून सदर निधी शेतकरी कर्जमाफीला द्यावा .
मागासवर्गीय समाजाच्या निधीवर मुख्यमंत्र्यांनी दरोडा घालणे हि बाब दलित अत्याचार प्रतिबंध कायद्याअंतर्गत येते हे मुख्यमंत्र्याना माहिती नसावे .
सरकारने तातडीने आपला निर्णय रद्द करावा अशी मागणी आंदोलनात करण्यात आली . यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा बाजी कार्यकर्त्यांनी केली .
सदर आंदोलनात भीम आर्मीचे मार्गदर्शक सीताराम गंगावणे , गौतम काटे , शरद घोडके , प्रदीप कांबळे , मुकेश गायकवाड ,विवेक सावंत , जयवंत पोळ ,
सुभाष खंडाळे , सदा देवनावर , भास्कर भिंगारे , शब्बीर तांबोळी , हुसेन राजनाळ , किरण कांबळे , विक्की जावळे ,बाळासाहेब लालसरे , आरिफ तांबोळी ,
आयुब शेख , संतोष पवार , ललितानंद तांदळे , धनंजय सुतार , श्रीकांत निकाळजे , संदीप शेंडगे , दीपक बलाडे ,
नितीन सरोदे व सुखदेव कुचेकर आदी प्रमुख कार्यकर्ते व प्रमुख पदाधिकारी सहभागी झाले असल्याची माहिती सजग नागरिक टाइम्स प्रतिनिधीला मिळाली.