Homeताज्या घडामोडीभवानी पेठ क्षेत्रीय कार्यालय की जुगाराचा अड्डा?

भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालय की जुगाराचा अड्डा?

सनाटा प्रतिनिधी ; भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात अनेक अनागोंदी कारभार बाहेर येत असताना त्यातीलच एक नविन प्रकार समोर आला आहे .भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयातील आरोग्य कचरा विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी कामे नसल्या मुळे एक नविन युक्ती शोधुन काढली आहे. ती आहे जुगार खेळण्याची युक्ती आरोग्य कोठीतील DSI, SI, मुकादम, हे कुणाची भिती न बागडता थेट शासकिय कार्यालयात जुगार खेळत असल्याचे  सजग नागरिक टाइम्स च्या प्रतिनिंधीच्या निदर्शनास आले. तसेच भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात चालणारे जुगाराचे खेळ हे सर्वांना ठाऊक होते परंतु रोखणार कोण.. सनाटा प्रतिनिधीला पाहून हातातील पत्ते लपवण्याचा प्रयत्न केला परंतु ते अपयशी ठरले, आज जुगार खेळत आहे तर उद्या दारूच्या बाटल्या आणतील, तर परवा..अश्या जुगारी  अधिकारी व कर्मचारी  यांच्या वर कुणाल कुमार हे निलंबणाची कारवाई करतील का असा प्रश्न नागरिक विचारत आहेत कि भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाचे नाव बदलुन मदिरालय? हे नाव ठेवण्याची तर वेळ येणार नाही ना..  तसेच आता भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयातील रिकाम टेकयांवर नागरिकांचे लक्ष लागून राहणार आहे , जुगार खेळणाऱ्या विरोधात तातडीने कारवाई करण्यात यावी अन्यथा लोकहित फाउंडेशन पुणे भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालया समोर आंदोलन करेल असा इशारा आयुकत कुणाल कुमार यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हणटले आहे.. 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular