मनसेचे अजय शिंदेसह 13 जणांन विरोधात सिंहगड पोलीस ठाण्यात एफ आय आर दाखल.

sajag-advertisement-offerWEB HOSTING OFFER
Advertisement

सनाटा प्रतिनिधी ; सिंहगड रोड वरील राजाराम पुलाच्या जवळील फुटपाथावर फळ विक्री करणाऱ्याना काल दि 2 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच्या 40/50 कार्यकर्त्यांनी मिळून मारहाण करत तोडफोड केली असल्याची तक्रार सिंहगड पोलिसात दाखल .आज दि ३ नोव्हेंबर रोजी दिवस भर त्याची चर्चा हि सुरू होती शेवटी मनसे चे शहर अध्यक्ष अजय शिंदे व त्यांच्या कार्यकर्तांवर सिंहगड पोलीस ठाण्या कडून कारवाई करण्यात आली आहे .


या चुकीच्या कलमाखाली कारवाई केल्याबद्दल मनसे कार्यकर्त्यांनी धरणे हि धरले पण त्याचा उपयोग झाले नसल्याचे नागरिकांनी सांगितले .या तोडफोडी बद्दल गुलाबहसन गुलामनबी बागवान रा जयदेव नगर राजाराम पुल सिंहगड रोड पुणे यांच्या तक्रारी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे, बागवान यांनी फिर्यादीत म्हटले आहे कि अचानकपणे चाळीस ते पन्नास लोकांचे घोळक्याने हल्ला चढवला व घोषणाबाजी करत तोडफोड करत बांबूच्या सहाय्याने मारहाण केली आणि लोकांमध्ये दहशत निर्माण केली. तसेच फळविक्रीतुन जमा झालेली रक्कम सर्व मिळून अंदाजे 26 हजार 500 रूपये बळजबरीने काडून चोरी करून नेले व फळे रस्त्यावर भिरकावून नुकसाण केल्याचे म्हटले आहे. त्यामुळे मनसे मध्ये खळबळ माजली आहे दरोडयाचे गुन्हे दाखल झाल्याने मनसेच्या कार्यकर्त्यानी रोष व्यक्त केला असुन चुकिची कलमे लादुन दडपशाही करत असल्याचे मनसे कार्यकर्त्यांकडून सांगितले जात आहे.

Leave a Reply

कमी गुंतवणुकीत आजच आपले News Portal बनवा व पैसे कमवा

न्यूज वेबसाईट एका दिवसात बनवून मिळेल