मापात पाप करण्यात  स्वीट होम आघाडीवर

*मिठाई चोरो से सावधान…..*
*मापात पाप करण्यात  स्वीट होम आघाडीवर..*
सनाटा प्रतिनिधी ;  आज आपण मिठाई च्या दुकानात मिठाई घेण्यासाठी गेलो तर कधी कधी वजन काट्या कडे लक्ष नसल्याने माल, वस्तु कमी मिळते तर कधी कधी वजन काटे पाहणारे नागरिकांना हि मिठाई चोरी जात असल्याचे दिसून येत नाही .परंतु वैध मापन शास्त्र विभाग पुणे यांनी केलेल्या तपासणी मध्ये मात्र  उघडकीस आले आहे कि  वजनात मोठी घट होत असताना सर्व सामान्य नागरिकांच्या निदर्शनास लवकर येत नाही. याचाच फायदा शहरातील व जिल्हयातील काहि स्वीट होम घेत आहे .हे सर्व प्रकार लोकहित फाउंडेशन पुणे चे अध्यक्ष अजहर अहमद खान यांनी माहिती अधिकारात  उघडकीस आणले आहे. नागरिकांना काहि चुकिचे प्रकार आढळून आल्यास वैध मापन शास्त्र विभाग पुणे कॅम्प  येथे तक्रार करावी असे आव्हान अजहर खान यांनी केले आहे किंवा सनाटा प्रतिनिधीला या नंबर वर संपर्क साधावा 9881433883/  8055306463

Support our journalism - Support Sajag Nagrikk Times

Leave a Reply