ताज्या घडामोडी

पुण्यातील स्पीडब्रेकरने घेतला तरुणाचा जीव

Advertisement

पुण्यातील स्पीडब्रेकरने घेतला तरुणाचा जीव (vishrantwadi speed breaker accident news):

Accident due to speed breaker in vishrantwadi in pune
संग्रहित फोटो

 पुणे;विश्रांतवाडी परिसरातील पठाणशहा दर्गाह जवळ असलेल्या डीवायडरला धडकून एका २६ वर्षीय तरुणाने आपले जीव गमावले,

विनोद बाळासाहेब आरोटे वय २६ वर्ष रा.मैत्री हॉटेल जवळ संगमनेर जी.अहमदनगर हा तरून १८ ऑक्टोबर रोजी रात्री ११ वाजता म्हस्केवस्तीकडून विश्रांतवाडीकडे येत असताना

पठाणशहा दर्गाह जवळ असलेल्या स्पीडब्रेकरचा अंदाज न आल्याने स्पीडब्रेकर वरून जाताना त्याचा तोल गेला व जवळच असलेल्या डीवायडरला धडकला.

Advertisement

vishrantwadi speed breaker accident boy death

यामध्ये तो स्वतः गंभीर जखमी झाला व मरण पावला असून सदरील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दरवडे यांनी केला .

सदरील प्रकरणात पोलिसांनी मरण पावलेल्या व्यक्तीलाच आरोपी ठरवले असून ज्या अधिकाऱ्याच्या वा कर्मचारीच्या निष्क्रिय कामामुळे तरुणाचा जीव गेला त्याचा उल्लेख प्रेसनोट मध्ये कोठेही करण्यात आलेला नाही,

सदरील प्रकरणात पोलिसांनी पाहिले आहे का स्पीडब्रेकर नियमानुसार बसविले आहे का? फक्त जबाबदारी झटकण्याचे काम दिसत आहे. सदरील प्रकरणात पोलीस आयुक्त लक्ष घालतील का ?

Accident due to speedbreaker in vishrantwadi
Share Now

Leave a Reply