लेख

इस्लाममध्ये विवाह बंधन नव्हे एक करार आहे.

Advertisement

इस्लाममध्ये विवाह बंधन नव्हे एक करार आहे.

marriage-is-not-bondage-but-marriage-is-a-contract

जगातील विविध धर्म आणि संस्कृतीमध्ये विवाह एक पवित्र बंधन किंवा एक पवित्र नाते आहे.

(Islam) इस्लाम जगातील सर्वात शेवटचा आणि आधुनिक संदेश असल्याने त्याला ही भूमिका मान्य नाही.इस्लामने विवाह संस्थेत कित्येक आमूलाग्र बदल केले.

त्यापैकीच एक मुलभूत बदल म्हणजे त्याने विवाहाच्या पवित्र बंधन असण्याच्या संकल्पनेवरच घाव घातला आहे.

(Islam) इस्लाम विवाहाला एक बंधन नव्हे तर एक करार मानतो. इस्लामने केलेल्या या बदलांना समजण्यापूर्वी आपल्याला विवाह संस्कृतीचा संक्षिप्त इतिहास पाहावा लागेल.

Marriage: भारतीय संस्कृती:

वास्तविक्त: भारतीय संस्कृती नावाची गोष्ट स्वातंत्रोत्तर काळात उदयास आणली गेली आहे. आपल्या राष्ट्राला स्वत:ची अशी एक संस्कृती नसून हा देश विविध संस्कृतींचा देश आहे.

या विविध संस्कृतीमध्ये विवाहाच्या विविध पद्धती प्रचलित होत्या, त्यापैकी काही कालानुक्रमे नष्ट झाल्या तर बऱ्याचशा आजदेखील अस्तित्वात आणि प्रचलित आहेत.

भारतात प्रामुख्याने ८ प्रकारच्या विवाह पद्धती आढळत असत. त्यापैकी असुर, राक्षस आणि पिशाच्च विवाह या अत्यंत तिरस्कृत विवाह पद्धती आहेत.

त्याचप्रकारे कन्येला दान करण्याची प्रथा, तिचा जन्म होताच तिच्यावर मालकी हक्क सांगून ती मोठी झाल्यास तिचा विवाह करून तिला घेऊन जायची प्रथा,

एकाच मुलीचे अनेक नवरदेव निर्धारित करण्याची प्रथा भारतात आज देखील अस्तित्वात आहेत.

(येथे कोणत्याही प्रकारची टीका करण्याचा हेतू नसून केवळ निदर्शनास आणून देणे हा उद्देश आहे.

हा हिंदू समाजाचा अंतर्गत प्रश्न असून त्याबद्दल कसल्याही प्रकारचे भाष्य करण्याचा आमचा विचार नाही.)

भारतीय समाज मान्यतेनुसार विवाह एक पवित्र बंधन असून ते जन्मोजन्माचे नाते आहे जे टिकवून ठेवणे दांपत्याचे धार्मिक तसेच नैतिक कर्तव्य आहे.

तसेच अनेक प्रकारच्या प्रथा आणि परंपरा भारतीय समाजात आढळतात ज्यामध्ये या बंधनाला ७ जन्मापर्यंत टिकविण्यासाठी स्त्रियांनी विविध विधी आणि कर्मकांड करण्याची शिकवण देण्यात आलेली आहे.

सात जन्माचे पवित्र बंधन असल्याने नशिबाला आले ते मुकट सहन करत जाणे भागच आहे, अशी मानसिकता यामुळे समाजात रुजली.

 विवाह बंधन केवळ मृत्यूमुळे खंडित होतो, पुढच्या जन्मी हे खंडित बंधन असेच सुरु राहते अशी श्रद्धा समाजात मान्यता प्राप्त आहे.

Marriage: युरोपीय संस्कृती:

युरोपीय समाजावर ख्रिस्ती धर्माचा (खरे पाहता प्रचलित ख्रिस्ती धर्म येशुंच्या नसून संत पौलच्या शिकवणीवर आधारलेला आहे)

पगडा असल्यामुळे विवाहाबद्दल ख्रिस्ती शिकवणींचा प्रभाव त्यांच्यावर आढळतो.

विवाह एक पवित्र नाते असून ते साक्षात स्वर्गात निर्धारित झालेले असल्याने त्यात दांपत्याला कसल्याही प्रकारचा अधिकार प्राप्त नसल्याची ख्रिस्ती धर्माची भूमिका आहे.

ख्रिस्ती धर्मामध्ये पुनर्जन्माची संकल्पना नसल्याने विवाह हे या जन्माचे नाते असून त्याला आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत टिकविणे हे दोन्ही पक्षांचे धार्मिक तसेच अध्यात्मिक दायित्व आहे, अशी ख्रिस्ती धर्माची आणि समाजाची भूमिका आहे.

अरेबियन संस्कृती:

marriage-is-not-bondage-but-marriage-is-a-contract

(Islam) इस्लामपूर्व अरब संस्कृतीमध्ये विवाहची कोणतीही एक सर्वमान्य प्रथा प्रचलित नव्हती.

समाजातील प्रतिष्टीत आणि निम्न समजल्या जाणाऱ्या स्तरात विवाहाची कोणतीही एक प्रकारची प्रथा प्रचलित नसून ती समाज निहाय बदलत जायची.

त्यापैकी एक प्रसिद्ध पद्धती म्हणजे विवाहाची इच्छा राखणारा पुरुष स्त्रीच्या पालकाकडे विनंती करायचा आणि ते आपल्या मुलीला तिच्या विवाहात द्यायचे.

हेपण वाचा :freedom fighter भाग 8, मुख्तार अहमद अंसारी

Islami Marriage: इस्लामी विवाह:

Advertisement

इस्लामनुसार विवाह एक सामाजिक बंधन नसून एक करार आहे. कराराच्या अस्तित्वात येण्यासाठी अनिवार्य असणाऱ्या सर्व बाबींची पूर्तता इस्लाम करतो.

दोन्ही भिन्न पक्ष आपल्या मर्जीने एक करार करून एकमेकांसोबत जीवन व्यतीत करण्यास राजी होतात, अशी इस्लाममध्ये विवाहाची संकल्पना आहे.

करारामध्ये ज्या प्रकारे दोन्ही पक्षांचे कर्तव्य आणि त्यांच्या जबाबदार्या निर्धारित करण्यात आलेल्या असतात,

 त्याप्रकारे इस्लाम पती आणि पत्नी दोन्हींचे कर्तव्य आणि जबाबदाऱ्या निर्धारित करतो.

परंतु या करारामध्ये कसलेही कोरडेपण राहू नये, यामध्ये मानवी भावनांचा ओलावा निर्माण व्हावा यासाठी तो उच्चतम नैतिक आणि अध्यात्मिक स्वरूप विवाहाला देतो.

प्रेषित मुहम्मद आपल्या अनुयायांना उपदेश करताना म्हणतात, “तुमच्यापैकी सर्वश्रेष्ठ तो आहे जो आपल्या पत्नीसाठी सर्वश्रेष्ठ सिद्ध होतो” (संदर्भ- सहीह मुस्लीम) यामुळे आपसूकच पतीमध्ये एक आदर्श पती बनण्याची भावना उत्पन्न होते.

सोबतच प्रेषित मुहम्मद हे देखील म्हणतात कि “आपल्या पत्नीशी न्याय करा अल्लाहकडे तुम्हाला तिच्या अधिकाराबद्दल प्रश्न केला जाईल” (संदर्भ- सहीह तिर्मिजी) याद्वारे प्रेषित मुहम्मद स्त्रियांच्या हक्कांना अध्यात्मिक्तेशी जोडतात.

कुरआन या नात्याला अलंकारिक भाषेमध्ये अशाप्रकारे गुंफतो कि “त्या तुमचा पोशाख आहात आणि तुम्ही त्यांचा पोशाख”. ललित साहित्याची जाणीव असलेला या भाषेला चांगल्याप्रकारे समजू शकतो.

(पवित्र कुरआन : सुरे बकरा) (या विषयावर अधिक माहितीसाठी माझी “तिचे विश्व आणि इस्लाम” ही लेखमाला वाचावी)

करार का?

विवाहाला नाते आणि बंधन संबोधल्याने दाम्पत्याचे कित्येक अधिकार संपुष्टात येतात तसेच दोन्ही पक्षांपैकी एकाला न्याय मिळत नसेल तर दुसर्याच्या विरोधात फिर्याद करण्याचा देखील त्याला अधिकार राहत नाही.

तसेच नाते आणि बंधन या संकल्पनेला कायद्यात्मक तरतुदीत बसविता येत नाही. उदा. तुमचे माझ्याशी मैत्रीचे नाते आहे. मी तुम्हाला भेटतो, मदत करतो म्हणजे मी हे नाते जपत आहे.

परंतु तुमची मदत करणे माझ्यावर बंधनकारक नाही. मी तुम्हाला अटेन्शन देत नाही किंवा पूर्वीसारखे नाते जपत नाही म्हणून तुम्ही माझ्याविरोधात जगातील कोणत्याही न्यायालयात जाण्याचा अधिकार राखत नाही.

तसेच आई-वडिलांचे आपल्या संततीबरोबरचे नाते एक बंधन असून पालक आपली संतती कशीही असो त्यांच्याशी न्याय करण्यास बांधील आहेत.

विवाहाला नाते समजल्यास ते कायद्याच्या कोणत्याही तरतुदीत बसत नाही. या कारणाने दांपत्यास अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.

तसेच विवाहाला एक बंधन म्हणून मान्य केल्यास दोन्हीपैकी एका पक्षावर याची सर्वस्वी जबाबदारी येऊन त्यावर अन्याय होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

म्हणून इस्लाम विवाहाला नाते किंवा बंधन म्हणून मान्यता देणे नाकारतो आणि याला एक करार स्वरुपात मान्यता देतो.

जागतिक न्यायव्यवस्था आणि विवाह:

आज जागतिक न्यायव्यवस्थेने काही अंशी विवाहाला एक नाते किंवा बंधन ऐवजी करार म्हणून मान्यता दिली आहे.

विवाहाला न्यायालयाच्या प्रक्रियेत सामील करण्यासाठी तिचा एक करार असणे अनिवार्य आहे.

जगातील प्रत्येक न्यायापीठ याच अनुषंगाने चर्चा घडवीत आहे कि कोणत्याप्रकारे या नात्याला एक परिपूर्ण “करार” या संकल्पनेत अंतर्भूत करावे.

इस्लाममध्ये विवाह करारच असल्यामुळे मुस्लीम विरोधाचा प्रश्न येतच नाही.

विरोध आहे मुस्लीमेत्तर समाज आणि संस्कृतींचा, ज्यांच्या दृष्टीकोनातून विवाह एक पवित्र बंधन आहे. इस्लाममध्ये तर हे एक पवित्र करार आहे.

विवाहाला करार स्वरुपात मान्यता देणे म्हणजे विवाहाची इस्लामी संकल्पना स्वीकारणे होय.

एकीकळे मुस्लीम कायदा जाचक आहे म्हणून अपप्रचार करायचा आणि दुसरीकडे इस्लामी तत्वांना मागच्या दाराने मान्य करायचे,

ही दांभिकता नव्हे तर काय आहे? सत्य तर हेच आहे कि आधुनिक समाजाच्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देण्यास इस्लाम केवळ समर्थच नव्हे तर एकमात्र पर्याय सिद्ध होत आहे.

लेखक :मुजाहिद शेख 

Share Now

2 thoughts on “इस्लाममध्ये विवाह बंधन नव्हे एक करार आहे.

Leave a Reply