ब्रेकिंग न्यूज

हडपसर मध्ये पीएमपी बस पास दरवाढ विरोधात स्वाक्षरी मोहीम.

Advertisement
सजग नागरिक टाइम्स: पीएमपी बस पास दरवाढ विरोधात पुण्यातील विविध सामाजिक संस्थांच्या वतीने हडपसर गाडीतळ येथे स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. पीएमपी प्रशासनाने जेष्ठ नागरिक, विद्यार्थी, सामान्‍य नागरिकांचे पास चे दर पीएमपीएमल ने काही महिन्यापुर्वी अचानक वाढविले. या दरवाढीचा फटका पीएमपी ने नियमित प्रवास करणार्‍या प्रवाशांना सहन करावा लागत आहे. या दरवढीला पुणेकरांनी विरोध केला पण  दरवाढ मागे घेण्यात आली नाही.यामुळे पुण्यातील विविध सामाजिक संस्थानी एकत्र येऊन पुण्यातील विविध भागात स्वाक्षरी मोहीम राबविण्याचे ठरविले.

या नुसार काल  हडपसर गाडीतळ येथे साय. 4 ते 6 वेळेत पीएमपी बस पास दरवाढ विरोधात स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 504 प्रवाशांनी या दरवाढीचा विरोध करत स्वाक्षरी केल्या. यामधे जेष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांचा सहभाग महत्वपूर्ण होता. पुण्यातील सर्व प्रमुख ठिकाणी ही सह्यांची मोहीम राबविण्यात येणार आहे आणि एकूण जमा झालेल्या सह्यांचे निवेदन पुण्याचे महापौर आणि मुख्यमंत्री फडणवीस यांना देणार असल्याचे पीएमपी प्रवासी मंचाचे संजय शितोळे यांनी सांगितले. आज झालेल्या मोहिमेत पीएमपी प्रवासी मंचाचे संजय शितोळे, आशा शिंदे, रूपेश केसेकर, इम्रान मनेर, परिवर्तन चे अनिकेत राठी, आम आदमी पक्षचे स्वप्नेश कुंजीर, अझहर बेग यांनी सहभाग घेतला असल्याची माहिती मिळाली.
Share Now

Leave a Reply