जात पडताळणी पत्र वेळेत न दिल्याने ही कारवाई करण्यात आली
सजग नागरीक टाईम्स: प्रतिनिधी : पुणे महापालिकेतील सात नगरसेवकांचे पद रद्द करण्याची शिफारस पुणे महापालिका आयुक्तांनी आज राज्य सरकारकडे केली. जात पडताळणी पत्र वेळेत न दिल्याने ही कारवाई करण्यात आली. याबाबत सर्वोच्च न्यायालयाने कोल्हापूरमधील सदस्यांचे पद रद्द केल्यानंतर इतर महापालिकांतही कारवाई सुरू झाली आहे.
सजग च्या व्हिडीओ बातम्या पाहण्यासाठी क्लीक करा
त्याचा परिणाम पुण्यात दिसून आला.या कारवाईत भाजपचे पाच आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दोन सदस्य आहेत. कारवाई झालेल्या सातपैकी सहा नगरसेविका आहे. भाजपच्या पाच नगरसेविकांचा यात समावेश आहे. यात किरण जठार, फरजाना शेख, वर्षा साठे, कविता वैरागे आणि आरती कोंढरे या भाजपच्या नगरसेविकांचे पद रद्द होणार आहे. राष्ट्रवादीच्या नगरसेविका रुक्साना इनामदार आणि नगरसवेक बाळा धनकवडे यांचेही पद जाणार आहे. आयुक्तांच्या शिफारशीनंतर राज्य सरकार पद रद्द झाल्याचा स्वतंत्र आदेश काढणार आहे.
मुस्लिम मूक महामोर्चाचे सर्व व्हिडीओ बातम्या पाहण्यासाठी क्लीक करा
पुणे महालिकेत भाजपचे पूर्ण बहुमत आहे. त्यांचे संख्याबळ 97 वरून 92 वर येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे संख्याबळ 42 वरून 40 वर येईल. एकाच वेळी इतक्या नगरसेवकांचे पद रद्द होण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर निवडणूक आयोगाने याबाबत महापालिका आयुक्तांना अशा नगरसेवकांवर कारवाई करण्याचा आदेश दिला होता.