सुधा भारद्वाज आणि गौतम नवलाखा यांच्या ट्रान्झिट रिमांडला उच्च न्यायालयाची स्थगिती

sajag-advertisement-offerWEB HOSTING OFFER
Advertisement

High Court’s stay: बंदी असलेल्या माओवादी संघटनेशी संबंध असलेल्या संशयावरुन पुणे पोलिसांनी मंगळवारी देशभरातील ७ ठिकाणी घातलेल्या छाप्यात ५ जणांना अटक केली़.

 मात्र, सुधा भारद्वाज आणि गौतम नवलाखा यांच्या ट्रान्झिट रिमांडला उच्च न्यायालयाने तातडीने स्थगिती दिल्याने(High Court stay) पुणे पोलिसांना झटका बसला आहे़.

 गौतम नवलाखा यांच्या अर्जाची आज बुधवारी सुनावणी होणार असून सुधा भारद्वाज यांच्या याचिकेवर गुरुवारी सुनावणी होणार आहे़ .

तोपर्यंत त्यांना पुण्याला नेण्यास विरोध केला असून त्यांना नजरकैदेत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत़.

३१ डिसेंबर २०१७ रोजी शनिवारवाडा येथे झालेल्या एल्गार परिषदेत भडकावू भाषणानंतर विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता़.

Advertisement

त्याचा तपास करीत असताना या एल्गार परिषदेला माओवादी संघटनांनी पैसा पुरविल्याचे निष्पन्न झाले होते़. 

त्याअनुषंगाने पुणे पोलिसांनी यापूर्वी नक्षलवाद्यांशी संबंधित असलेल्या ५ जणांना अटक केली होती़. 

त्यांच्याकडे केलेल्या तपासात व मिळालेल्या ई-मेलमध्ये राजीव गांधी यांच्याप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हत्या करण्याचा कट रचला जात असल्याची माहिती मिळाली होती़. 

Advertisement

तसेच बंदी असलेल्या माओवादी संघटनांशी या कार्यकत्यांचा संबंध असल्याचे निष्पन्न झाल्याने मंगळवारी पुणे पोलिसांनी कवी वरावरा राव (हैदराबाद),

Advertisement

इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल वीकली चे संपादकीय सल्लागार गौतम नवलाखा (दिल्ली), मानवी हक्क कार्यकर्त्या सुधा भारद्वाज (फरिदाबाद)

व व्हर्नोन गोन्साल्विस (मुंबई) अरुण फरेरा (ठाणे) यांना अटक केली़. फरिदाबाद येथील सत्र न्यायालयातून सुधा भारद्वाज यांना हजर करण्यात आले़.

त्यांना पुणे न्यायालयात हजर करण्यासाठी ट्रान्झिट रिमांड मागण्यात आला़. न्यायालयाने तो मंजूर केला़.

पुणे पोलिसांचे पथक त्यांना पुण्याला घेऊन जाण्याची तयारी करत असतानाच भारद्वाज यांचे नातेवाईक उच्च न्यायालयात गेले़. त्यांनी तातडीने हेबियस कॉर्प्स याचिका दाखल केली़.High Court’s stay

Advertisement

 

Leave a Reply